कोरोना सदृश लक्षणे दिसू लागल्यावर किती दिवसांनी rtPCR करावी?

मोठा गहन प्रश्न आहे हा.. आणि अगदी भले भले म्हणजे अगदी काही डॉक्टर देखील वेगवेगळे सल्ले देत आहेत.

चला आज आपणच याचे उत्तर शोधुया , आपल्याला मिळालेली नवी माहिती वापरून.

त्यानुसार लक्षात आलेच असेल कि संसर्ग झाल्याझाल्या (रुग्णाशी संपर्क आला असल्यास ) शरीरातील विषाणूंची संख्या कमी असते आणि ती सतत वाढत असते . विषाणूंनी ठराविक पातळी गाठली कि नैसर्गिक innate इम्युनिटी पूर्णतः कार्यान्वित होते आणि रुग्णाला लक्षणे दिसणे सुरु होते.

प्रवेशित विषाणू (Bolus of infection) संख्या जास्त असेल तर १४ पेक्षा कमी दिवसांमध्ये लक्षणे दिसून आपण आजारी पडणार. आणि जर प्रवेशित विषाणू संख्या बरीच कमी असेल तर तर ते लक्षणांसाठी आवश्यक असलेली ठराविक पातळी गाठणार नाहीत आणि त्यामुळे आपण लक्षणविहीन रुग्ण बनतो.

आता rtPCR या तपासणी मध्ये काय करतात हे पाहू.

हि तपासणी विषाणूमधील जैविक घटक म्हणजे RNA शरीरामध्ये आहे कि नाही हे तपासते.

rtPCR ही इतर तपासण्याहून खास आहे.

(या तपासणीच्या तंत्रज्ञानामुळे एच आय व्ही आजाराबाबत खूप सोय झाली होती . शरीरातील एच आय व्ही व्हायरस कितीही कमी असला तरीही या तपासणी मुळे समजते. त्यामुळे लवकर व खात्रीशीर निदान करणे शक्य झाले.)

इतर प्रकारच्या तपासण्या पॉझीटीव्ह येण्यासाठी sample मध्ये जंतूंची संख्या ठराविक पातळीहून (threshold) अधिक असणे आवश्यक असते , नसेल तर टेस्ट मध्ये जंतू पकडले जात नाहीत .

मात्र sample मधील RNA ची संख्या कमी असली तरी देखील rtPCR तंत्रज्ञानाने ती संख्या वाढवली जाते. प्रत्येक सायकल मध्ये संख्या वाढत वाढत threshold पर्यंत पोचते आणि मग टेस्ट पॉझीटीव्ह येते. अर्थात त्यासाठी sample मध्ये RNA असायला मात्र हवा.

sample मध्ये जर RNA कमी असेल तर तर संख्या पुरेशी होण्यासाठी जास्त cycles लागतात . पण टेस्ट कमी RNA मध्येही पॉझीटीव्ह येते . म्हणून तर rtPCR तपासणीमध्ये लक्षणविहीन रुग्ण देखील सापडतात. जे विषाणू अजून रुग्णाच्या इम्युनिटीला सापडलेले नसतात ते विषाणू देखील rtPCR तंत्रज्ञान आपल्याला सापडवून देत. आणि संसर्गाची शृंखला मोडण्यास आपल्याला मदत करते.

जेव्हा रुग्णाला लक्षणे सुरु होतात त्यावेळी विषाणूंची संख्या / viral load जास्त असतो आणि लक्षणे सुरु होताच जर rtPCR केली तर आपण लगेच निदान व उपचार करू शकतो . रुग्णाला आयसोलेट करून प्रसार थांबवू शकतो.

कोविडची लक्षणे सुरु झाली म्हणजे viral load वाढलेला आहे, त्यामुळे rtPCR लगेच करता येते , अजून ३-४ दिवस वाट बघायची गरज नाही

वेळेवर तपासणी करुया आणि संसर्ग साखळी तोडूया !

  • डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) M. D. साथरोगतज्ञ , मिरज.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here