पोटॅशियम शोनाईट म्हणजे काय, वापरण्याची पद्धत व फायदे

● पोटॅशियम शोनाईट हे उत्पादन पोटॅशियम व मॅग्नेशियम या अन्नद्रव्यांचा डबल सल्फेट सॉल्ट आहे. हे खत पाण्यात १०० % विद्राव्य असल्याने जमिनीतून, ड्रीपमधून किंवा फवारणीतून वापरता येते.

● यात २३% पोटॅश, १०% मॅग्नेशियम व १५% गंधक ही अन्नद्रव्ये आहेत.

● कोणत्याही पिकाच्या पक्वतेच्या काळात मॅग्नेशियम व पोटॅश या अन्नद्रव्यांची गरज मोठ्या प्रमाणावर लागते कारण पिष्टमय पदार्थ व स्टार्च यांच्या चयापचयाच्या क्रियेत अनुक्रमे मॅग्नेशियम व पोटॅश ही अन्नद्रव्ये भाग घेतात म्हणून त्याचा पुरवठा अपुरा असल्यास फळांची वाढ आणि क्वॉलिटी यांवर विपरित परिणाम दिसून येतात.

● पक्वतापूर्व स्थितीमध्ये शिफारशीनुसार पोटॅशियम शोनाईटचा जमिनीतून, ड्रीपमधून किंवा फवारणीतून वापर केल्यास फळे व भाजीपाला पिकांमध्ये साखरनिर्मिती व फळांची फुगवण यावर अपेक्षित परिणाम दिसून येतो.

● पोटॅशमुळे फळे व भाजीपाला पिकांची फुगवण तर होते, पानांचा हिरवा रंग व पर्यायाने त्यांची कार्यक्षमता मॅग्नेशियममुळे अबाधित राहते.

● गंधकामुळे पिकाची रोगप्रतिकारशक्ती व फळांची टिकाऊ क्षमता वाढते तसेच पिकाची पक्वता लवकर व एकसारखी होते.

● मातीतील कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅशियम या धनभारित (कॅटायन्स) अन्नद्रव्यांचे परस्पर प्रमाण त्या मातीची कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी (धन व ऋण आयन देवाण घेवाण करण्याची क्षमता) ठरवण्यासाठी कारणीभूत ठरते.

● कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी चांगली असल्यास मुळांच्या टप्यातील अन्नद्रव्ये जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होतात व शोधून घेतली जातात.

● पोटॅशियम शोनाईटमध्ये *पोटॅशियम व मॅग्नेशियम ही अन्नद्रव्ये असल्याने मुळांच्या कक्षेतील कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी सुधारण्यास व पर्यायाने अन्नद्रव्यांची उपलब्धता व त्यांचे मुळांकडून होणारे शोषण वाढण्यास मदत होते.

● पिकाच्या पक्वतापूर्व अवस्थेत पोटॅशियम शोनाइट जमिनीतून एकरी २५ किलो किंवा पाण्यात १००% विद्राव्य असल्याने ड्रीपमधून (३-५ किलो प्रति एकर, दर आठवडयाला ४-५ वेळा) किंवा फवारणीतूनही (१ किलो प्रति १०० लीटर पाणी) देता येते.

● फळ पिकांसाठी फळवाढीच्या काळात, भाजीपाला पिकांसाठी फळवाढ व तोडयाच्या काळात, ऊस पिकासाठी देत असल्यास लागणीनंतर ६ महिन्यांनी, कांद्यासाठी रोपे लागणीनंतर २ ते २.५ महिन्यांनी, बटाटयासाठी भर देताना व आले-हळदीसाठी पाचव्या महिन्यानंतर वापरावे किंवा या काळात दर १२ ते १५ दिवसांनी २-३ फवारण्या कराव्यात.

◆ वापरण्याचे प्रमाण :-

● जमिनीतून – फळे व भाजीपाला पिकांसाठी फळांचे सेटिंग झाल्यावर एकरी २५ किलो एकदा द्यावे.

● ड्रीपमधून – फळे व भाजीपाला पिकांच्या पक्वतापूर्व तसेच तोड्याच्या काळात एकरी ३ ते ५ किलो दर आठवडयाला ४ ते ५ वेळा सोडावे.

● फवारणीतून – ड्रीपची सोय नसल्यास फळे व भाजीपाला पिकांच्या पक्वतापूर्व तसेच तोडयाच्या काळात

—: अधिक माहितीसाठी संपर्क :―

अॅग्रीकॉस फार्मिंग सोल्यूशन्स
(कृषी सल्ला व मार्गदर्शन केंद्र)
नामपूर, ता. सटाणा, जि. नाशिक – ४२३३०१
फोन – ९९६०५८०९६८.

6 COMMENTS

  1. सर मला कोणते रासायनिक खते काय काम करते व कोण औषध फवारणी काय कार्य करते व ते किती काळ करते याची माहिती हवी होती

    . आपला शेतकरी

  2. सर आणखी गंधक बद्दल माहिती द्या

  3. सर नमस्कार, मका पिकावर सुरुवातीपासूनच आळी पडली आहे काय करायचे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here