ऊस शेतीमध्ये सुक्ष्मअन्नद्रव्याचा वापर

गेली 50वर्षे झाली आपण ऊस काढून ऊस करतोय जमिनीला अजिबात विश्रांती नाही.
ऊसाला उपयुक्त असणाऱ्या पिकांची फेरपालट नाही. सातत्याने ऊस काढून ऊस.. एकाच प्रकारचे पिकाचे उत्पादन घेत आहोत.त्यामुळे आज ऊसपिका मध्ये सुक्ष्मअन्नद्रव्याची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्याचा पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम दिसून येतोय.
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे सूक्ष्म अन्नद्रव्यांबाबतच्या झालेल्या संशोधनावरून असे आढळून आले आहे, की राज्यातील ऊसाखालील जमिनीमध्ये लोह, मॅंगनीज, जस्त आणि बोरॉन या चार सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता प्रकर्षाने जाणवते.

आमची एक 70गुंठे क्षेत्र चुनखडीयुक्त आहे.त्या जमिनीमध्ये ऊसाची बांधणी केल्यानंतर संपूर्ण प्लॉट वरती केवडा यायचा.व संपूर्ण प्लॉट पिवळसर होऊन ऊसाची वाढ थांबायची. ऊस तुटे पर्यंत त्याच्यावरचा केवडा जात नव्हता.त्यामुळे ऊसाचे अपेक्षित उत्पादन मिळायचे नाही. व त्याचा फार मोठा आर्थिक फटका बसायचा.त्याच क्षेत्रातील खोडवा ऊस लावणी पेक्षा जास्त प्रमाणात केवड्याला बळी पडायचा, व त्याचे उत्पादन एकरी 25/30टना पर्यंत खाली यायचे. त्याला बरेचशे उपाय करून बघितले मात्र केवडा कमी होत नव्हता.

त्यावेळी आतासारखे खास ऊसासाठी बनवलेले कॉम्बिपॅक मिळत नव्हते. नुकतेच 1/2कंपनीचे सुक्ष्मअन्नद्रवे बाजारात आले होते.ते 10किलोच्या बैग मध्ये मिळायचे.परंतु ऊसाला सुक्ष्मअन्नद्रव्याची गरज आहे हेच माहीत नव्हते. त्यामुळे त्याचा वापर करणारे कमी असायचे. त्या 10किलोच्या बॅग मध्ये झिंक सल्फेट,फेरस सल्फेट मैग्नेशियम सल्फेट ,मैग्नीज,बोरॉन,मॉलिब्डेनम,कॉपर हे घटक असत. चुनखडीयुक्त क्षेत्रामध्ये एकरी 2बॅगा (20किलो) वापरून बघितले.परंतु काहीच फरक पडला नाही. कारण चुनखडी युक्त जमिनीमध्ये झिंक सल्फेट,व फेरस सल्फेटची गरज जास्त प्रमाणात असते.परंतु त्या 10 किलोच्या बॅग मधून मिळणारा फेरस व झिंक त्याला पुरेसा नव्हता.

त्यानंतर मग मी त्या क्षेत्रासाठी लूज मधील मिळणारे सुक्ष्मअन्नद्रवे वापरले.त्यासाठी एकरी 10किलो झिंक सल्फेट,10किलो फेरस सल्फेट,5किलो मैग्नीज,25किलो मैग्नेशियम सल्फेट, 3किलो बोरॉन व 10किलो पावडर स्वरूपातील गंधक 10किलो घेतले.व हे सर्व घटक एकरी 250 किलो चाळलेल्या शेणखतामध्ये मिसळून 8दिवस भट्टी लावून वापरले. लूज मधील सूक्ष्मअन्नद्रवे वापरल्याने अतिशय चांगला रिजर्ट मिळाला.
.
कारण लूज मध्ये आणलेले सुक्ष्मअन्नद्रवे हे 10किलो मध्ये मिळणाऱ्या सुक्ष्मअन्नद्रव्या पेक्षा कितीतरी पटीने जास्त होते. त्यामुळे ऊस पिकाला जेवढे घटक आवश्यक होते ते लूज मधून आणलेल्या सूक्ष्म घटका मधून मिळाले.मॉलिब्डेनम, किंवा कॉपर ची गरज ppm मध्ये असल्याने स्प्रे करून आपण ते घटक पुरवू शकतो. विशेषतः चुनखडीयुक्त क्षेत्रावरती एकरी 10किलो झिंक सल्फेट व 10किलो फेरस सल्फेट वापरल्या नंतर शेवट पर्यंत केवडा आला नाही. व सर्व पाने हिरवेगार झाले.पानांची रुंदी चांगली वाढली. कुठलीही कमतरता राहिली नाही त्यामुळे ऊसाच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ झाली.
त्यानंतर त्या क्षेत्रातील खोडवा पिकामध्ये वरीलप्रमाणे वापर केल्यानंतर खोडव्यामध्ये सुद्धा नंतर कधीच केवडा आला नाही.
आज बाजारात खास ऊसासाठी बनवलेले व वरील घटक असणारे चांगल्या कंपनीचे सुक्ष्मअन्नद्रवे उपलब्ध आहेत.ते साधारण 1800 ते 2100रु.च्या दरम्यान मिळतात.व त्यांची कॉलिटी लूज मध्ये मिळणाऱ्या सुक्ष्मअन्नद्रव्या पेक्षा चांगली आहे.

श्री. सुरेश कबाडे.
प्रबंधक, होय आम्ही शेतकरी समूह,
रा.कारंदवाडी ता:-वाळवा जि:-सांगली
मोबा:- 9403725999

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here