चीनची मक्तेदारी मान्य करण्याखेरीज आता पर्याय नाही

संपुर्ण विश्व ‘‘ कोरोना ‘‘ बरोबर मुकाबला करत आहे – चीनच्या वुहान मधुन सुरुवात झालेल्या या विषाणु पासुन चीनचे प्रमुख शहर शांघाय , बिजिंग मधे विषाणु ने शिरकाव कसा नसेल केला ?? जगातील अनेक बलाढ्य व्यक्तींना कोरोनाची लागण झाली मात्र चीन मधील कोणत्याही बड्या अधिकार्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास येत नाही.

वुहान पासुन बारा हजार किलोमिटर दुर अमेरीकेत कोरोना थैमान घालत आहे मात्र शेजारच्या रशिया या पासुन सुरक्षित कसा ? वास्तवीक परवा झालेल्या जी-२० या शिखर परीषदेत चीन ला जाब विचारण्याची गरज होती , तशी संधी होती मात्र सर्वच प्रबळ राष्ट्रांनी आता चीन समोर हात टेकल्याचे स्पष्ट दिसत आहे. अगदी चार दिवसा पुर्वी पर्यंत अमेरीकेचे बलाढ्य राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प् कोरोनास चीनी वायरस संबोधत होते मात्र परवा पासुन त्यांची बोली बदलल्याने एक प्रकारे चीन समोर सर्वांनी नांगी टाकली आहे हे वेगळे सांगणे नको.

कोरोनाचा जगभरात थैमान सुरु असतांना जगातील शेअर बाजार सुरु का ठेवले गेले आहे ? जवळपास सर्वच कंपन्यांचे मुल्यांकन निम्म्याहुन कमी झाले आहे – या कंपन्यांचे समभाग कवडीमोल किंमतीत कोण खरेदी करत आहे ? जगातील अर्थव्यवस्थाच पुर्णपणे वेठीस धरली जात आहे.

भारत देखील बहुतांश कच्च्या माला साठी चीनवर पुर्णपणे आवलंबीत आहे – उगाच कोणीही चीनी मालावर बहिष्क़ार टाका वगैरे फुसक्या मारत बसु नये. चष्म्याच्या काचा पासुन औषधांना लागणारा कच्चा माल , मोबाईल फोन असो की वर्तमान पत्राला लागणारे कागद – सगळ सगळ चीन पुरवतो. अगदी आपल्या अंतर्वस्त्रच्या निर्मितीस लागणारे कच्चा माल सुद्धा !!

चीनी ड्रॅगोन ने जगाला घट्ट विळखा मारलाय – कोणी मान्य करो अथवा ना करो …
This is a War.

@ ऍड योगेश पांडे –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here