लंडनची दहा लाख रुपयांची नोकरी सोडून हे जोडपे गावात शेती करीत आहे, यूट्यूबवर झाले प्रसिद्ध

94,300 views

प्रत्येक मनुष्याचे स्वप्न आहे की एक चांगली नोकरी करावी आणि चांगले उत्पन्न मिळवावे जेणेकरुन कुटुंबातील छोट्या-मोठ्या गरजा सहज पूर्ण होतील. पोरबंदर, गुजरातमधील बारन गावचे राम दे खुटी हे देखील पत्नी भारती खुटी यांच्यासमवेत लंडनमध्ये सेटल होते. दोघांनाही लाखाच्या घरात पगार होता. एके दिवशी दोघांनी ठरवले की गावी परत जाऊन तिकडेच शेती करू. त्यांनी घेतलेला हा धक्कादायक निर्णय शेवटी योग्य असल्याचे सिद्ध झाले. आज हे जोडपे आपल्या गावी परतले आणि देशभरातील तरूणांसाठी प्रेरणा बनले जे अगदी लहान नोकरीसाठीही गाव किंवा शहर सोडतात. दोघांची प्रेरणादायी कहाणी आपण जाणून घेऊयात

राम 2006 मध्ये इंग्लंडला गेले

राम दे खुटी  वर्ष 2006 मध्ये प्रथम इंग्लंडला गेले होते. तिथे त्यांना चांगली नोकरी देखील मिळाली होती. 2008  मध्ये राम यांनी भारतात येऊन भारतीशी लग्न केले. त्यावेळी भारती राजकोटमध्ये विमानतळ व्यवस्थापन आणि एअर होस्टेसचा अभ्यास करत होत्या. २०१० मध्ये भारती  शिक्षण संपल्यानंतर लंडनला पती रामसोबत राहण्यासाठी गेल्या. तेथे त्यांनी आंतरराष्ट्रीय पर्यटन व आतिथ्य व्यवस्थापन विषयात पदवी संपादन केली. या पदवीनंतर त्यांनी ब्रिटिश एअरवेजच्या हीथ्रो विमानतळावरुन आरोग्य आणि सुरक्षिततेचा कोर्स केला आणि त्यानंतर तेथे काम करण्यास सुरवात केली. राम आणि भारती लंडनमध्ये लक्झरी आयुष्य जगत होते.

भारतात परत का आले

बहुतेक लोक असा विचार करत असावेत की जेव्हा दोघे इंग्लंडमध्ये इतके अप्रतिम आयुष्य घालवत होते तेव्हा दोघे का खेड्यांकडे वळले. वास्तविक, इंग्लंडमध्ये वास्तव्य करताना राम यांना आपल्या आई वडिलांची काळजी कोण घेईल याबाबत चिंता होती. त्याचवेळी त्यांची शेती देखील मजुरांच्या करवी केली जात होती. आई वडिलांची सेवा करण्याच्या आणि शेतीत काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशाने दोघांनी भारतात येण्याचे ठरविले. यात पत्नी भारती यांचीही पूर्णपणे संमती होती.

शेतीत नवीन प्रयोग
अखेरीस हे दोघे लंडनची आलिशान जीवनशैली सोडून भारतात आले. येथे त्यांनी नव्याने शेती व पशुपालन करण्याचे काम सुरू केले. पारंपारिक शेती सोडून त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरवात केली. सुरुवातीला दोघांनाही हे काम करण्यात त्रास होत होता कारण या दोघांनी यापूर्वी कधीही हे काम केले नव्हते. तथापि, नंतर ते दोघेही शेती करण्यात गुंतले. दूध काढण्यापासून  सर्व कामे भरती स्वतः करतात. आपल्या ग्रामीण जीवनासंदर्भात, त्यांनी लिव्ह व्हिलेज लाइफ विथ ओम अँड फॅमिली नावाचे एक यूट्यूब चॅनल देखील तयार केले आहे, ज्यात 6 लाखाहून अधिक सबस्क्रायबर आहेत. ज्यावर ती तिच्या रोजच्या नित्यकर्माविषयी माहिती देते. शेती व पशुसंवर्धन यावर टिप्स देते.  राम आणि भारती यांना एक मुलगा देखील आहे, जो बहुतेक व्हिडिओंमध्ये दिसतो.

त्यांचा व्हिडिओ आपण खालील लिंकवरती पाहू शकता

https://www.youtube.com/channel/UCK_cj1K08Zry1HvIXBcgIQw

 • राज्यात यंदा विक्रमी ऊस गाळप होणार
  महाराष्ट्राच्या इतिहासात राज्यात यंदा पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर उसाचे उत्पादन झाले असून, एक हजार ९६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होणार आहे. त्या दृष्टीने साखर कारखाने आणि आयुक्तालयाकडून ऊस गाळपाचे नियोजन करण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक १२.३४ लाख हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. गुळ आणि बेण्यांसाठी वापरण्यात येणारा दहा टक्के ऊस वगळता एक हजार … Read more
 • अशी ठेवा ट्रॅक्टरची निगा जी देईल १० वर्षापर्यंत जबरदस्त सेवा
  आजकाल शेतीच्या कामासाठी बैलजोडीपेक्षा ट्रक्टरचा वापर खूपच वाढला आहे. ट्रक्टरच्या सहाय्याने नांगरणी, काकऱ्या घालणे, जमीन भुसभुशीत करणे, जमीन सपाटीकरण, पेरणी करणे, आंतरमशागत करणे, मालाची वाहतूक करणे इ. कामे सुलभरीत्या, दर्जेदारपणे, कमी वेळेत, वेळेवर आणि कमी त्रासात तसेच कमी खर्चात होऊ शकतात. किंबहुना शेती व्यवसायाच्या भरभराटीत ट्रक्टरचे स्थान फार महत्वाचे आहे. शेती व्यवसायाला ट्रक्टर हे वरदान … Read more
 • झेंडू पिकासाठीचे खत व पाणी व्यवस्थापन
  झेंडूचे पीक महाराष्ट्रात तिन्ही हंगामात घेतले जाते व त्यास सण-उत्सव व लग्न सोहळ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर मागणी असते. आफ्रिकन आणि फ्रेंच जातींसाठी शेणखत २५ ते ३० मे. टन प्रति हेक्टर या प्रमाणे तसेच १०० किलो नत्र, २०० किलो स्फुरद व २००किलो पालाश या प्रमाणे खते दयावी. संकरीत जातींची लागवड करायची असल्यास प्रति हेक्टर नत्र २५० किलो, … Read more
 • कृषी आणि अन्नप्रक्रिया उत्पादनांसाठी ‘महाराष्ट्र ब्रँड’ विकसित करण्यात येणार; राज्य कृषीमंत्र्यांची घोषणा
  राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य पीक योजनेतंर्गत रब्बी हंगाममध्ये हरभरा, गहू, मका आणि रब्बी ज्वारी या पिकांची प्रमाणित बियाणे वितरण तसंच पिक प्रात्यक्षिक यांचे नियोजन करण्यात आलं आहे. या बाबी महाडीबीटी प्रणालीद्वारे राबवण्यात येणार असून पीक प्रात्यक्षिकं शेतकरी गटामार्फत राबवले जाणार आहे. राज्य कृषी विभाग 'महाराष्ट्र ब्रँड' विकसित करणार असल्याची घोषणा राज्य कृषी मंत्री दादा … Read more
 • सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा जोमाने वाढ
  मागील आठवड्यात बाजारात सोयाबीन ला बाजारभाव चांगल्या प्रकारे मिळाला आहे. यावेळी खरीप हंगामात पेरणी ला उशीर झाला झाल्याने बाजारात सोयाबीन ची आवक कमी झाली आणि त्यामुळे आवक कमी आणि दर जास्त मिळाले. सोयापेंड चा जो परिणाम बाजारावर होणार होता यो परिणामी कमी च प्रमाणात झालेला आहे. मागील आठवड्यात बाजारामध्ये सोयाबीन च्या दरात ५०० ते ७०० … Read more

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here