पाळेकरांच्या शिवारफेरीतील शेतकरी अनुभव अर्थात पाळेकरांची पोलखोल

दिनांक 4 Aug 2019 श्री व सौ अश्विनी शरद वायाळ यांच्या *सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती *बागेत शिवार फेरी होती आमच्या भागात गेले 20 दिवस पाऊस पडतोय त्यामुळे सगळी दलदल झाली आहे म्हणून सदर कार्यक्रम ऍग्रो टुरिस्ट हॉटेल osara येथे ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाची वेळ 10 ते 4 अशी होती पाऊस येत असल्याने मला तिथे पोचायला 11 वाजून गेले होते.
प्रास्ताविक संपून गेले होते. पाळेकर यांचे भाषण संपत असतांना शेवटी 15 मिनिट ऐकले. त्यांची कृषी विद्यापीठ आदी गोष्टीवरून आगपाखड सुरू होती.
बरं तिथं कुणालाही प्रश्न विचारु दिले जात नव्हते भाषण सुरू आहे म्हणून एकवेळ ठीक आहे. त्यानंतर मुंबई च्या दोन बसेस आल्या. पाळेकर यांच्याच भाषेत शेतकरी म्हणजे विषमुक्त अन्न धान्य भाजीपाला उत्पादक व शहरी ( पूणे मुंबई कर) म्हणजे ग्राहक याला ते मॉडेल म्हणतात. साधारण 250 ते 300 लोक जमले होते मुंबईहून 88 लोक पुण्याहून 100 लोक आणि पाळेकर यांची नैसर्गिक शेती करणारे 50 लोक असे बाकी वायाळ कुटुंब, अजून श्री माऊली खंडागळे शिवसेना ग्रामीण नेते, श्री श्रीराम भाऊ ( राष्ट्रीय अध्यक्ष भाजीपाला उत्पादक संघ) नारायणगाव चे उपसरपंच. आणि सगळ्यांच्या डोळ्यात सलणारा मी आतकरी ज्ञानदेव.

शेतकरी श्री.वायाळ

पाळेकर यांनी त्यांचे भाषण एकतर्फी संपवून भुरभुर पावसात शिवार फेरी करायला सांगितली. शिवार फेरीतही फक्त तेच बोलत होते नाही म्हणायला वायाळ दाम्पत्य अधे मध्ये काही तरी बोलायचे. शिवार फेरी झाल्यावर जेवण झाले मग त्यांच्याच भाषेत प्रश्न उत्तर असे शेषन होते एक दोन शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले तर त्यांना नैसर्गिक शेतीची पुस्तक घ्यायचा सल्ला दिला. मी संधीची वाट पाहत होतो.
पाळेकर यांनी प्रश्न विचारला डाळिंब बाग पाहिल्यानंतर कुणाला बाग आवडली नाही.त्यांनी हात वर करा.
कुणीही हात वर केला नाही. ( विरोधी बोललं की पाळेकर अपमान करतात)
उलट मुंबईकर आणि पुणेकर बोलत होते कसली सॉलिड बाग आहे किती लालभडक पोमो ( डाळिंब) आहेत वैग्रे वैगरे सगळे फोटो आहेत.
कोडकौतुक सुरू असताना त्यांनी पुन्हा विचारले कुणाला आपले मनोगत व्यक्त करायचे असेल तर समोर या मग मी समोर गेलो.
मी माईक हाती घेतला माझी ओळख करून दिली मी स्वतः MSc agri आहे माझं स्पेशलायझेशन Genetics and plant breeding आहे.
2009 ते आता पर्यंत marketing ( fertilizer plant proctection) production ( biofertilizer PGR)
त्यानंतर R and D ICRISAT hyderabad.
माझी स्वतःची बाजरी पिकाची दोन हायब्रीड मार्केट मध्ये आहेत.
(पाळेकर बोलले वैयक्तिक नको नैसर्गिक शेती बद्दल बोला)
मी सुरवात केली नैसर्गिक शेती बद्दल बरच ऐकून होतो बझेट मध्ये झिरो बजेट ला उल्लेख आल्यामुळे खात्री करण्यासाठी इथे आलोय. त्यांना झिरो बजेट शब्दाचा राग आला असावा ते बोलले *झिरो नाही सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती* असा उल्लेख करा)  मी सांगितले शिवार फेरीत दिसणारे गवत आणि अंतरपीक त्यात डाळिंब बाग यांची सांगड बुद्धीला पटत नाही.फळावर sucking पेस्ट चा अटॅक आहे त्याला ते खरडा म्हणजे sun burning म्हणतात 
फळ माशीच अटॅक आहे कुठे मुठे मर रोगाने झाडे मरायला सुरवात झाली आहे. मी ह्या बागेवर सतत दर महिण्याला चक्कर मारेन आणि दोन वर्षांनी ही बाग अशीच राहिली तर स्वतः नैसर्गिक शेतीचा प्रचार करेन.

बागेत तण आहे का तणात बाग आहे ते ओळखा

पाळेकर रागाने थरथरत होते.
त्यांनी सांगितले आता बास माईक द्या 
मी बोललो मला दोन मिनिटं बोलू द्या.
त्या वेळात मी खालील प्रश्न विचारले.
१) हरितक्रांती आधी भारतात नैसर्गिक शेतीच होत होती तरी भारत अन्न धान्य यात स्वयंपूर्ण नव्हता
२)तुम्ही म्हणताय तसं कृषी विद्यापिठ खोटं बोलत आहेत तर सरकार त्यांना सुरू का ठेवतय.
३) दुग्ध क्रांती झाली त्यानंतर भारतात संकरित गायी चे प्रमाण वाढले वाढत आहे.
देशी गायी म्हशी यांचं दूध एवढया मोठ्या लोकसंख्येला पुरेल काय?
४)कृषी विद्यापीठ खोटं बोलन्यामागे काय लॉजिक आहे?
माझा माईक काढून घेण्यात आला.
या दोन चार प्रश्नाचा त्यांना भयंकर राग आला होता.
पाळेकर यांनी चिडून खालील दावे केले आहेत 
*दावा क्रमांक* १ ) सुभाष पाळेकर नैसर्गीक शेती राष्ट्रीय स्तरावर तसेच अंतर राष्ट्रीय स्तरावर मान्यता पावली आहे.
२) राष्ट्रीय स्तरावर ICAR चे DG Dr महोपात्रा यांनी सुभाष पाळेकर यांना सांगितले आहे की आतापर्यंत आम्ही सर्व चुकीचा अभ्यासक्रम शिकवला इथून पुढे आम्ही नैसर्गिक शेती अभ्यासक्रमात घेऊ.

डाळिंबासोबत तणांचे जबरदस्त उत्पादन

(तुम्ही फक्त साधे MSc agri आहेत तुमच्या सगळ्यांचे विद्यापीठाचे बाप ICAR चे DG त्यांचे 250 कृषी शास्त्रज्ञ हजारो लाखो शेतकरी यांनी आम्हाला मान्यता दिलीय.)

दावा क्रमांक ३) बाराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्रपती असताना त्यांनी 12 लोकांचे शिष्टमंडळ पाळेकर यांच्याकडे पाठवून white house मध्ये पिकवलेला विषमुक्त भाजीपाला खाल्ला आहे.
४) पूर्ण जगातील 34 देश आणि UNO यांनी त्यांची शिष्टमंडळ पाठवून पाळेकर यांची नैसर्गिक शेती हीच शाश्वत शेती असून तिला अभासक्रमात स्थान देऊ असे सांगितले आहे.
५) भारतात 50 लाख शेतकरी आहेत ते नैसर्गिक आहेत आणि तितकेच किंवा त्याहून जास्त ग्राहक विषमुक्त अन्न खातात
६) 2050 ला भारताची लोकसंख्या 150 कोटी म्हणजे चीन पेक्षा जास्त होईल त्यावेळी फक्त नैसर्गिक शेती भारताची अन्न धान्याची गरज भागवू शकेल.
७) कापूस पिकातील Bt वाणापेक्षा नैसर्गिक शेती मधील देशी कापूस जास्त उत्पादन देतो.
८)कोणत्याही संकरित वाणापेक्षा नैसर्गिक शेतीत तयार झालेले देशी वाण जास्त उत्पादन देतात.
९) विज्ञान म्हणजे अज्ञान आहे कारण तुम्ही ज्या गोष्टी अस्तित्वात आहेत त्याच शोधू शकता आम्ही नैसर्गिक वाले जे डोळ्यांनी दिसत तेच प्रमाण मानतो.
१०) कृषी विद्यापीठ थोतांड आहेत…
बी बियाणे रासायनिक खते बुरशीनाशक कीटकनाशक तणनाशक यांच्या कंपन्या व विद्यापीठ यांचं भारतीय शेती संपवायच शडयंत्र आहे.
११)पिकाला खत पाणी जमिनीतून मिळते ही गोष्ट डोक्यातुन काढून टाका पिकाची 98% गरज सूर्यप्रकाश आणि हवा यातून भागते.
१२) तण पिकाला धन देते त्यामुळे बागेत हरळी नसेल तर आणून लावा.
१३) ते इथून पुढे टेरेस गार्डन तयार करणारे मॉडेल डेव्हलप करत आहेत लगेच आमच्या समोर एका विदुषी ची त्या कामावर नेमणूक करण्यात आली
१४) संकरित गायी पाळू नका फक्त देशी गाई पाळा 
१५)दूध हे माणसाचे अन्न नसून ते वासराचे अन्न आहे.
१६) पिकाला कोणत्याही खत औषध याची गरज नसते.
१७) फुकाओहो यांच्या नैसर्गिक शेतीत पेरा आणि काढायला जा हे चुकीचे तत्व आहे.
१८) तन उपटू नका ते जागेवर कापुन त्याचे आच्छादन करा त्यावर जीवांमृत फवारले असता त्याच हूमस होते आणि पिकाची खताची गरज भागते.
१९)तुम्ही देत असलेल्या पाण्याच्या 10 % पाण्यात मी नैसर्गिक शेती करू शकतो.
२०) जर पिकांना खत औषधे लागत असती तर जंगलातील झाडांना अगणित फळे कशी आहेत?
२१) जर जंगलात सगळी झाडे एकत्र फुलत फळत असतील तर
मीही शेतात जंगल बाग मॉडेल तयार करणार
२३) एक एकर जंगल बागेत प्रतिवर्षी १२ लाख रूपये उत्पादन घेता येते.
(त्यांच अर्थशास्त्र एक उसात 600 मिली रस निघतो म्हणजे 20 रुपयांचे दोन ग्लास असा 40 टन ऊस निघाला तर तुम्ही च गुणाकार करा)
२४)नैसर्गिक शेती करून करोडपती शेतकरी झाल्यावर शेतकऱ्यांच्या दारासमोर मुलींच्या बापाची लाईन लागेल आमची मुलगी करा म्हणून.
२५) दर अमावस्या पौर्णिमेला कीटक अंडी घालतात म्हनून जीवमूर्त फवारणी करावी
२६) चतुर्थी अष्टमी द्वादशी अशी अग्नीस्त्र ब्रम्हास्त्र (तिसरे मी विसरलो) अशी फवारणी घेतली असता कोणताही कीटक बागेवर येत नाही.
२७) बाग लागवडी आधी घण जीवामृत देऊन जमीन पैलवान करून घ्यावी.
२८) वेळो वेळी जीवमूर्त द्यावे हाताने शिंपडुन दिलेले जिवामृत जास्त जलवा दाखवते.
२९) ड्रीप काढून फेकून द्या त्या ऐवजी पाट पानी वापरा
३०) ज्याना शक्य असेल त्यांनि स्प्रिंकलर वापरा.
३१) तुमच्या डोक्यातुन खत पाणी हे विषय काढून टाका.

एवढं सगळं झाल्यावर तिथल्या यजमान वायाळ ताई यांनी त्यांचे उत्पादन (500 डाळिंब झाडे) गेल्यावर्षी कमी म्हणजे नैसर्गिक शेती ची सुरवात असल्याने ८ टन होते यंदा त्यांना तेच उत्पादन 13 टन येईल असा अंदाज आहे असे सांगितले तेही कोणताही खर्च न करता असे सांगून कार्यक्रमाची सांगता झाली 
मी सोडून उपस्थित सर्वांनी पाळेकर गुरुजींचे पाय धरून आशीर्वाद घेतले.
मला तरी दोन तीन मिनिट वेळ मिळाला विनंती करूनही पुन्हा प्रश्न विचारू दिले नाहीत बाकी सर्वांना पुस्तक विकत घेण्याचा सल्ला देण्यात आला.
दिलेल्या फोटोत नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकरी मित्रांचे मोबाइल नंबर आहेत

आतकरी ज्ञानदेव
9701472008

9 COMMENTS

 1. जैविक निविष्ठा जसे जिवाणू खत किंवा जीवामृत ह्यांचा वापर जर रासायनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनि वाढवला तर त्यांचे उत्पादन निव्वळ रासायनिक शेती मधून जेवढं आलं असत त्या हुन अधिक होते. ऊस पीक मध्ये जीवामृत हे पिकाचे सर्व गरज पूर्ण करू शकले नाही. त्याचे एक मुख्य कारण त्या मध्ये असलेल्या नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूंची कमी मात्रा. जर नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूंची मात्रा वाढवली व एकरी 8 डबे शेणखत घातले तर उत्पादन नक्कीच वाढू शकेल.

 2. ज्वारीचे शिवकालीन वाण दगडी आजही पेरली जाते व दुसरे वाण मालदांडी चे संशोधन 1972 चे आहे.नंतरचे संशोधन कुठे आहे ? शेतकर्यानी केलेले जुगाड तंत्रज्ञान विद्यापीठ स्वतःच्या नाशे प्रसिद्ध करते.विद्यारपिठे ही सरकारी बाबूंची कुरणं आहेत.

  • अनिल सर maldandi (M 35-1) च सन्शोधन 1932-1935 च आहे.

   नंतर च सन्शोधन सुद्धा उत्तम आहे.

   फरक फक्त एवढा की मालदांडी हून सरस वाण जो चारा व धान्य उत्पन्न जास्त देईल व बिना पाण्याचा येईल…तो तयार करता नाही आला.

   विद्यापीठात राजकारण्याचा हस्तक्षेप बंद झाला तरच अपेक्षा असावी.

 3. Mi Parmeshwar Ram Kumbhar,Wadji taluka south solapur,Dist.Solapur,M.Sc.Biotechnology,Tumhala kontya gosticha problem kiva shanka ahe naisargik sheti baddal .tar ek wel amchya shetila bhet dya Baga khatri Kara mag bola,8788373503

 4. सर
  मी फूकोउका एका कडातून क्रांती तसेच चिपळूणकर यांचीही पुस्तक वाचली आहेत त्यात त्यांचं जे संशोधन आहे किंवा त्यांच्या ज्या पद्धती आहेत त्या खऱ्या अर्थाने नैसर्गिक वाटतात कारण जमिनी मध्ये सेंद्रिय कर्ब वाढला तरच त्याचा पिकाला फायदा होईल फक्त आच्छादनाणे काहीच नाही होणार आणि zbnf च म्हणन आहे की त्यांच्या जीवामृत वापरलं की जिवाणू वाढतील पण त्या जीवणुला जगण्यासाठी जे कर्ब लागतो त्याच्याबद्दल ते काहीच बोलत नाहीत

 5. येड खूळ म्हातारं पाळेकर,, शेट्ट समजत नाही त्याला

 6. पाळेकर यांचा धंदा फक्त विध्यापिठाला शिव्या देने व स्वतःची पुस्तके विकणे ,कार्यक्रमा तुन पैसे कमविणे होय

 7. सुभाष पाळेकर हा मानसिक रुग्ण आहे , हा चुतयाचा बाजार आहे , हा अतिशय कंजूस माणूस आहे, हा स्वभावाने हेकळ, याला कुणी सांगितलेलं पटत नाही हा मादरचोद विजीट फी पैसे घेतो, निरर्थक पुस्तक घेण्यास लावतो या भाडवयाच्या नदी लागु नये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here