सेंद्रिय शेतीचे ओला उबेर मॉडेल

दिल्लीच्या 37 वर्षीय गीतांजली या शेतीचं अनोखे मॉडेल विकसित करताहेत. 2017 मध्ये त्यांनी फार्मिजन नावाने स्टार्टअप सुरू केलंय. बंगळुरू, हैदराबाद व सुरतेत कंपनी काम करते. मुळच्या त्या बंगळुरूच्या होत. शेतकऱ्यांबरोबर पार्टनरशिप करून सेंद्रिय शेती सुरू केली. 600 – 600 स्वेअरफुटांच्या आकारात शेताचे तुकडे केले. ते ग्राहकांना 2500 रु. प्रतिमाह दराने भाड्याने दिले. ग्राहक मोबाईल अॅपद्वारे आपल्या प्लॉटची निवड करतात आणि तिथे पसंतीचा भाजीपाला लागवड करण्यास सांगतात. ग्राहकांची संख्या तीन हजारावर पोचलीय.

भाजीपाला तयार झाल्यावर ‘फार्मिजन’च्या वाहनांद्वारे ग्राहकांना घरपोच दिली जाते. या मॉडेलचे दोन फायदे आहेत. 1. ग्राहकांना घरबसल्या 100 टक्के सेंद्रिय भाजीपाला मिळतोय. 2. शेतकऱ्यांचे उत्पन्न तीनपटीने वाढले आहे.

अलिकडेच ‘फार्मिजन’ने सेंद्रिय फळांचीही थेट पोच सुरू केलीय.  कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 8.4 कोटी रुपये आहे. ‘गोल्डमॅन सॅक्स’ व ‘फॉर्च्यून’ यांनी गेल्या वर्षी गीतांजली यांना ग्लोबल वुमन लीडर पुरस्कार दिलाय. 2014 मध्ये त्यांनी टीसीएसची नोकरी सोडली. स्वत:च काम उभं करायचं होत. प्लॉटिंग-गार्डनिंगचा छंद होता. 2014 मध्येच ग्रीन माय लाईफ नामक कंपनी सुरू केली. रुफ टॉप गार्डनिंग, टेरेस गार्डनिंग, डिझाइनिंग आदी कामे केली जातात. वार्षिक उलाढाल 6 कोटींची आहे.

ओला-उबेर सारखे मॉडेल:
बिझनेस मॉडेल साधे सरळ आहे. ग्राहकांना सेफ भाजीपाला हवाय, तर शेतकऱ्यांना किफायती उत्पन्न. फार्मिजन शेतकऱ्यांना सेंद्रिय बी-बियाणे, खते-औषधे पुरवते. अडीच हजार रु. भाडे फार्मिजन व शेतकरी अर्धे-अर्धे वाटून घेतात. उमेदीची वर्ष नोकरीत गेले म्हणून काय झाले. नव काही करण्याची उमेद थोडीच सरते, उमेदीला थोडेच वयाचं बंधन असते. गीतांजली यांनी ते सिद्ध केलंय!

माहिती आणि फोटो स्रोत – मनी भास्कर डॉट कॉम

 • अनुवाद – दीपक चव्हाण, पुणे
 • IAP मराठी फेसबुक ग्रुप पोस्ट

8 COMMENTS

 1. खुपंच छान उपक्रम. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या पध्दतीने शेती केल्यास नक्कीच फायदा होईल.

 2. सेंद्रिय शेतीमाल, ही काळाची गरज आहे, शेतकर्‍यांनी नक्की विचार करायला लावणारी पोस्ट.

 3. I have four acres of banana plantation.i use only organic manure.but due to climate change there was fungal infection which made me uproot 800 plants .IAM planing to grow vegetables but market is a problem

 4. उपक्रम छान आहे. पण कोणत्या शेतकऱ्याने अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये नोंदणी करू नये कारण#- -पुढे वाचा
  स्वतः चा माल स्वतः विका गत करून. ___-
  मार्ग चांगला आहे पण हा फक्त शेतकऱ्यांनी अवलांबवा वा ,दुसऱ्या कोणाच्या हातात शेती चालवायला देऊ नये. कारण याचे जेवढे फायदे आहे तेवढे तोटे आहे. Ola उदाहरण. सुरवातीला गाडी मालकाला मोठ्या प्रमाणात पैसे देऊन अमिष दाखवले की आमच्याकडे कस्टमर मोठ्या प्रमणावर ऑनलाइन येतो. नंतर मोठ्या प्रमाणात गाडी चालक ओला अँप ला जॉईन झाला.पण आता त्यांची सत्ता असल्या सारखे करायला सुरूवात केली आहे.पण आता फिरणारा कस्टमर पूर्ण पणे ओला कार बोलवतो तसे. लोकल वाहतूकिने प्रवास करत नाही.monopoly(एकाधिकार,मक्तेदारी) सुरू आहे. मी स्वतः ola (ओला ) कार चालका कडून ऐकलं आहे .
  त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्या कंपनीच्या अंडर मध्ये नोंदणी करू नका.नंतर शेतकऱ्यांना ओला सारखं ऐकायची वेळ येईल .
  #कारणं. आता सगळ्या इंडस्ट्री झाल्या . भारतात व इतर देशातल्या आता मोठ्या कंपन्या शेती क्षेत्रात येऊन बिझनेस मॉडेल तयार करून पुन्हा शेतकऱ्याच्या मालावर मोठं होण्याचं स्वप्न पाहत आहे .(जॉन डीयर सारख्या अजून मोठ्या बऱ्याच कंपन्या)
  #शेतकऱ्यांनी काय करावं आता:-
  आपल्या गावो गावी गट तयार करून आपला शेतमाल मागणी नुसार बाहेर देशात निर्यात करावा .शाशन खूप तायारीत आहे या गोष्टी साठी .पण शेतकऱ्यंपर्यंत पूर्ण पने माहिती पोहचत नाहीये.सावधान..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here