ग्रामीण आणि शहरी भागात होतोय लग्न समारंभामध्ये जीवघेणा डामडौल

गावाकडे फेब्रुवारी – मार्चमध्ये कोरोना संसर्ग वेगाने वाढला. मुख्य निमित्त ठरले लग्नसराईचे. ग्रामीण व निमशहरी भागातील मोठ्या गर्दीचे लग्न समारंभ हे सुपरस्प्रेडर ठरलेत आहेत.

“अमूक एक लग्नाला गेल्याने सर्व कुटुंब बाधित झाले,” असे खूपवेळा ऐकायला मिळाले. आजकाल हायवे कडेला लॉन्स किंवा मंगल कार्यालयात होणारे लग्न समारंभ हा एक गहन विषय आहे. रस्त्याच्या कडेला आडव्यातिडव्या लागलेल्या शेकडो गाड्या, अफाट गर्दी, खानपान अन् एकूणच डामडौल नजरेत भरणारा असतो. इथे मंगल आहे की दंगल असा प्रश्न पडावा. अर्थात ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण, त्यामुळे होणारे सामाजिक नुकसान विचारात घेतले पाहिजे.

खरे तर खासगीत बोलताना लोकांची भूमिका असते, की असे मोठे लग्न समारंभ टाळले पाहिजे. पण प्रत्यक्षात प्रतिष्ठा पणाला लावून हा अनावश्यक खेळ खेळला जातोय. कुठेतरी हे थांबले पाहिजे. कर्ती माणसे अर्ध्यात निघून जाताहेत. या जीवित हानी कुटुंबे उद्धवस्त होताहेत…

हे थांबले पाहिजे. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतरही 50 – 100 लोकांमध्येच विवाह लावण्याची प्रथा रूढ केली पाहिजे, असे लोक आता बोलू लागले आहेत. बड्या नेत्या मंडळींचे लोक अनुकरण करतात. त्यांनी ही सुरवात केली समाजाचा वेळ, पैसा वाचेल. महामारी ही सूचक आहे. आपण धडा घेवू शकतो. काळाप्रमाणे बदलू शकतो.

  • दीपक चव्हाण, ता. 16 मे 2021.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here