होय आम्ही शेतकरी समूहाचे 100+ ऊस उत्पादनाचे सूत्र

सुरेश कबाडे

शेतकरी बंधुनो १००+ ऊस उत्पादन घेण्यासाठी जास्त काही कष्ट करावे लागतात असे नाही पण जे काही करणार आहात ते एका विशिष्ट पद्धतीने केले पाहिजे. आपण उत्पादकांनी सुद्धा स्मार्टवर्कर होण्याची गरज आहे. १००+ ऊस उत्पादनासाठी आपणास अशीच एक स्मार्ट गोष्ट आम्ही सांगत आहोत त्याचा जरूर अवलंब करा..
एका एकरात ऊस तोडणीच्या वेळेस एका स्क्वे. फुटात एक ऊस ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे ४०००० ते ४२००० ऊस राहातील. प्रत्येक ऊस हा २.५ ते ३ किलो वजनाचा ऊस पोसवने आपणास सहज शक्य आहे. पण तोडणी पर्यंत अशा सशक्त ऊसांची एकरी संख्या टिकवणे म्हणजे फार कष्टाचे असते. जमिनीतील अन्नद्रव्ये, ओलावा आणि प्रकाश यासाठी ऊसांची बेटे,फुटवे,पाने,मुळ्या यांची ऊस वाढीच्या काळामध्ये परस्पराशी स्पर्धा होत रहाते त्यामुळे कितीही दाट लागण केली तरी फुटवे उत्तरोत्तर मरत जातात आणि तोडणी पर्यंत २२ ते २७ हजार किंवा त्या पेक्षा कमी संख्या मिळते हे टाळण्यासाठी उत्पादनाशी निगडीत विशेष महत्वाचे घटक ओळखून ते उच्च पातळीवर ठेवले तर मात्र एका स्क्वे फुटास एक ऊस ठेवणे शक्य आहे.
फेरपालट पीक,उन्हाळी नांगरट,शेणखत,कारखाना कंपोष्ट,लेंडीखत,पेंडीखत,कोंबडी खत,ऊसाचे पाचट आणि ताग धैंच्या यासारखी हिरवळीची खत अशा सेंद्रिय खतांनी जमिन समृध्द बनविने अगदी गरजेचे आहे. ॲझोटोबँक्टर,पीएसबी, ॲसेटोबँक्टर, पोटॅश मोबीलायझर व कंपोस्टींग कल्चर यासारख्या जिवाणू खतांचा वापर करून त्यांचे जमिनीतील प्रमाण वाढविले तर सेंद्रिय/रासायनिक खतामधल्या अन्नद्रव्याचे कोठार खुले करण्याची किमया ते करतात. जमिनीत न उपलब्ध होणाऱ्या स्वरूपात जी मूलद्रवे असतात त्यांचे विघटन करून ती पिकास उपलब्ध करून देतात त्यामुळं उसाची वाढ आणि जाडी दोन्ही योग्य प्रमाणात होतात.. आपल्या जमिनीत सेंद्रिय कर्ब प्रमाण किती आहे त्यावर आपल्या जमिनीतून उसाचे उत्पादन किती निघेल हे सूत्र अवलंबून आहे.. त्यामुळं सेंद्रिय खते, शेणखत, जीवणूखते, हिरवळीची खते या सर्वांचा वापर करावा.

✒प्रबंधक – महाराष्ट्र ऊस उत्पादक समूह ( होय आम्ही शेतकरी)

3 COMMENTS

  1. Comment:सर अल्पभूधारक शेतकरीसाठी ज्याच्याकडे 10 – 20 गुंठे जमिनीवरच ऊस करणे शक्य आहे अशा बांधवांसाठीही नियोजन व मार्गदर्शन फेसबुक ग्रुप व इथे करावे हि विनंती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here