उच्च उत्पादनासाठी ऊस लागवडीचे सूत्र

नमस्कार शेतकरी मित्रानो,

गेल्या वर्षी नोव्हेम्बर २०१८ मध्ये बियानेस गेलेल्या ऊसाचा खोडवा तुटुन गेला. एकूण ४ एकर क्षेत्रामध्ये एकरी ९५ टनाने खोडव्याचा उतारा बसला. त्यानंतर त्याचे पाचट कुट्टी करून घेतले. नांगरट ,रोटर व इतर मशागती करून मे महिन्यामध्ये एकरी १५ टन कारखान्याचे कंपोष्ट टाकून ५ फुटी सरी सोडले.

आज सोमवार दिनांक २२/०७/२०१९ रोजी त्या क्षेत्रामध्ये ऊस लावण सुरू केले आहे. को ८६०३२ या जातीच्या टिश्यूकल्चर ३ री पूर्ण झालेल्या ऊसाचा पुढील वर्षाच्या बेणे प्लॉट साठी लावण सुरू केले आहे.

लावण करत असताना ज्या बाजूला सूर्यप्रकाश जास्त पडतो, त्या बाजूला एक बगली लावण करतो. बेसल डोस देत असताना कुदळीच्या सहाय्याने चर काढून त्यामध्ये एकरी २ डीएपी ,१ पोटॅश व खोडकिडीसाठी क्लोरऐन्ट्रानिलिप्रोल ०.४ % एकरी ४ किलो वापरले. सुरुवातीलाच हे घटक वापरल्याने खोडकिडीचा अटॅक कमी होतो.एकूण मी ४ हप्त्यात क्लोरऐन्ट्रानिलिप्रोल वापरतो त्यामुळे खोडकिडीचे प्रमाण हे नियंत्रित राहते.

लावण करीत असताना स्वतःच्या बेनेमळ्यातील बेणे वापरतो.गेल्या वर्षी १ सप्टेंबर ला टिश्यूकल्चर २ स्टेज पूर्ण झालेल्या प्लॉट मधील चांगले जाड ऊस निवडून बेणे मळा केला होता.त्या प्लॉट मधील बेणे वापरले आहे.

निरोगी बेणेमळा- उच्च ऊस उत्पादनाची गुरुकिल्ली

लावण करत असताना ५/२ फूट अंतर वरती लावण सुरु केले आहे. त्यासाठी पहिल्यांदा 2 फुट अंतरावरती मार्किंग करून घेतले.मार्किंग केल्याने करेक्ट २ फूट अंतरावर लावण करता येते. एक समान अंतरावरती लावण केल्यामुळे सर्व ऊस एकसारखे एका जाडीचे मिळतात. तसेच एकरी डोळ्याची संख्या किती आहे ते कळते. व त्यानुसार आपणाला ऊसाच्या संख्याचे योग्य नियोजन करता येते.

मार्किंग


५/२ अंतर वरती एकरी ४३५६ डोळे लागले. प्रत्येकी १० फुटवे घेतले तर एकरी ४३५६० फुटवे मिळतील.म्हणजे एका स्क्वेअर फुटाला एक ऊस मिळेल.
योग्य अंतरावरती लावण केल्याने एकरी १५ ऊसाच्या २२ मोळी मध्ये एक एकर लावण करून. तुटाळ साठी एकरी ६८५ डोळे लावले.एक्स्ट्रा डोळे लावलेले सोडले तर एकरी १५ ऊसाच्या २० मोळी मध्ये एक एकर लावण झाले.
बीजप्रक्रिया करत असताना क्लोरो २० टक्के एक लिटर ला १ मिली ,बाविस्टीन १ लिटर ला २ ग्राम, व जर्मिनेटर १ लिटर ला १० मिली असे प्रमाण वापरले. या सर्वांचे एकत्रित द्रावण करून त्यामध्ये १० मिनिटे बियाणे बुडवून ठेवले.त्यानंतर मार्किंग केलेल्या खुणेवरती डोळा वरती करून ठेवले.त्यानंतर लावण पाण्यामध्ये करून घेतली.

बेनेमळा असल्याने या प्लॉटला ९ महिन्यापर्यंत नत्राचे डोसेस द्यावे लागणार आहेत.

ऊस उगविल्यानंतर ४०/४५ दिवसांनी ऊसाच्या दुसऱ्या बाजूला हिरवळीच्या खतासाठी ताग टोकण्याचा विचार आहे. ऊस ज्या वेळी बाळ भरणीला येईल त्यावेळी हा ताग पक्व होऊन मुजविण्यास येईल. सुरुवातीला जर ताग केले तर ऊसाच्या फुटव्याना तागाचे वसब पडून त्याचा ऊसाच्या फुटव्या वरती परिणाम होऊ शकतो.

बियाणे कटिंग


श्री. सुरेश कबाडे.
प्रबंधक, होय आम्ही शेतकरी समूह,
रा.कारंदवाडी ता:-वाळवा जि:-सांगली
मोबा:- 9403725999

7 COMMENTS

  1. ऊसा मधील पाचट सध्या काढणी (सोजळणे) चालू आहे जर सरी मधे पाचट टाकली तर ती किती दिवसा मधे कुजेल

  2. Threre were some misunderstandig & confusion, on distance beween sapling, width of chari, etc, your information has given me proper guudance, thanking you in deed.

  3. आण्णा, बेणे मळ्यातील​ बेणं शेतकऱ्यांना कसं देता ? म्हणजे काय दराने देताय ?

  4. सर,ऊस तोडणी केलेल्या खोडवा पिकात हरभरा घेतला तर चालेल काय, तसेच अजून काय घेता येईल
    जमीन मध्यम प्रतीची आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here