१६ वेळा राष्ट्रीय उत्पादकता पुरस्कार विजेते महामंडळ म्हणजे महाबीज. शेतकऱ्यांसाठी तुलनेने अधिक खात्रीचे बियाणे या माध्यमातून मिळत आले आहे. मात्र यातील अनेक रिक्तपदे व त्यामुळे निर्णयप्रक्रियेतील विलंब आणि त्यातून होणाऱ्या अडचणीच्या चक्रात अडकल्याचे आम्ही काही दिवसांपूर्वी होय आम्ही शेतकरी फाऊंडेशनने मांडले होते. होय आम्ही शेतकरी फाऊंडेशन या बद्दल शासनाकडे आग्रहाने पाठपुरावा करत होते. यासाठी पब्लिक ग्रीव्हीयन्स सुद्धा दाखल करण्यात आला होता.
नुकतेच दिनांक १७/२/२०२१ रोजी महाबीज ला श्री जी. श्रीकांत साहेब यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाचा कारभार स्वीकारला व रुजू झाले. प्रथमतः मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे, कृषिमंत्री दादासाहेब भुसे, महाराष्ट्र शासनाचे हार्दिक आभार. आपण अत्यंत तातडीचा प्रश्न हाताळण्यासाठी योग्य अधिकारी निवडल्याचा आनंद शेतकऱ्यांच्या वतीने व्यक्त होत आहे.
जी. श्रीकांत साहेब यांनी यापूर्वीही अकोला जिल्हाधिकारी असताना महाबीजचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला आहे त्यामुळे त्यांना यातील बारकावे अवगत आहेत. आशा आहे त्यांच्या नेहमीच्या धडाकेबाज पद्धतीने महामंडळास शिस्त लाऊन शेतकऱ्यांना येत्या हंगामात खात्रीचे, मुबलक बियाणे वेळेत उपलब्ध करून देऊ शकतील.
विशेषतः सोयाबीन बियाण्याचे शॉर्टएज व त्यातील न उगवण्याच्या समस्येला आळा बसेल अशी आशा महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
नव्याने व्यवस्थापकीय संचालक महाबीज पदी नियुक्ती झाल्याबद्दल होय आम्ही शेतकरी फाऊंडेशनच्या सर्व संचालक व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने श्री. जी. श्रीकांत साहेब यांना हार्दिक शुभेच्छा.