कोविड कथा: जनजागृतीकरता मल्टिमिडिया मार्गदर्शिका प्रकाशित

राष्ट्रीय विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान परीषदेचा(NCSTC) विज्ञान तंत्रज्ञान विभाग(DST) आणि डॉ अनामिका मेमोरियल ट्रस्ट यांनी मिळून कोविड-19 महामारीची ए टू झेड ( सर्वंकश ) माहिती देणार्या लोकप्रिय मल्टिमीडीया मार्गदर्शिकेची हिन्दी आवृत्ती काढली आहे.

या महिन्याच्या सुरूवातीलाच त्याची इंग्रजी प्रत प्रसिध्द झाली आहे . हिन्दी भाषिक भागातून कोविड कथाच्या आवृतीची जोरदार मागणी झाल्याने ही हिंदी आवृत्ती प्रकाशित झाली असून त्यात लोकांना उपयुक्त अधिक माहिती दिली आहे.

“सामान्य माणसांना विज्ञानाचे आकलन त्यांच्या भाषेतून करून दिले पाहिजे आणि हिंदी ही बहुसंख्यांची बोलीभाषा आहे  म्हणून कोविड कथा चे महत्व अधिक आहे”  असे डिएसटीचे सचिव प्रा आशुतोष शर्मा याची प्रशंसा करताना सांगितले.

या महामारीच्या काळात ,लोकांच्या मनावर ताण आलेला असतांना यातील विज्ञान व्यंगचित्रे  ( सायन्टून्स) वैज्ञानीक संदेश  आणि आरोग्याच्या संकल्पना सहज,रंजकतेने, हसत खेळत  लोकांना समजावून देतील.

भारत सरकारच्या  विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने मल्टिमिडीयाच्या  आणि डिजीटल माध्यमाद्वारे  कोविड -19 महामारीबद्दलची माहिती  लोकांना सहजपणे समजेल आणि त्यांच्या प्रश्नाचे सहजपणे आदानप्रदान होईल असे हे ईलेक्ट्राँनिक माध्यम जनजागृतीसाठी उपलब्ध केले आहे.

आनंदाची गोष्ट म्हणजे लोकांनी कोविड कथा चळवळ संपूर्ण देशभरात उचलून धरली असून त्याची साखळी तयार होत आहे. मेघालय राज्याच्या खासी भाषेत कोविड कथा भाषांतरीत होत आहे, तामिळ आवृत्ती तयार होत असून बंगाली आणि आसामी आवृत्त्यांचे काम सुरू आहे.

विज्ञान प्रसाराची तळमळ असलेले तज्ञ कोविड कथा फ्लिप आवृत्ती , ॲनिमेशन , व्हिडीओ अशा वेगवेगळ्या स्वरुपात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. वेगवेगळ्या अधिकृत संस्था  त्यांच्या सामाजिक माध्यमांसाठी आणि जनसंपर्कासाठी कोविड कथांमधील  करावे-न करावे अशा प्रकारची  माहिती,  सायन्टून्स ,व्यंजनांच्या ओळीने  दिली जाणारी दैनंदिन माहीती वापरत असून त्यायोगे हिन्दी भाषेतून तसेच स्थानिक भाषांतून कोविड कथा तळागाळापर्यंत पोहचत आहे.

कोविड कथा हिंदीसाठी येथे क्लिक करा

कोविड कथा इंग्रजीसाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here