हायब्रीड बियाणे समज गैरसमज

टोमॅटोचा संकर

संकरिकरण ( Hybridization)
“पिकात इच्छित गुणधर्म एकत्र आणण्यासाठी दोन वेगवेगळ्या जनूकविधा असलेल्या रोपांचा संकर करणे म्हणजे संकरिकरण(Hybridization).”

यातील इच्छित या शब्दासाठी रोपपैदासकार दिवस रात्र एक करत असतात. कारण असे कधीच होत नाही की घेतल्या वेगवेगळ्या जाती आणि केला संकर(Cross) की झालं  संकरीत वाण (Hybrid)….
 इच्छित गुणधर्म आणण्यासाठी कितीतरी वर्ष सतत त्या दृष्टीने प्रयत्न व  संशोधन करत राहावं लागतं आणि त्यांचे परिक्षण -चाचणी घेत राहावी लागते. तेव्हा ईच्छीत गुणधर्म असलेले शुद्ध नर व मादी तुम्हाला मिळवता येतात. त्यानंतर त्यांचा संकर करून उपलब्ध होणारी पहिली पिढी (F1 Hybrid) ही त्या नर व मादी दोघांपेक्षाही सरस आणि वरचढ असेल. त्यात संकरजोम (Hybrid Vigour, Heterosis) असेल, आपल्याला पाहिजे तेच इच्छित गुणधर्म त्यात आले असतील तरच ते Hybrid ची नोंदणी केली जाते. व नंतर ते आपल्याला बाहेर लागवडीसाठी मिळत असते.आणि यासाठी फक्त आणि फक्त विशिष्ट नर व मादी वाणाचीच निवड करावी लागते…

हे झालं संकरित वाण तयार कसं होत ? याबाबतीतच विश्लेषण. आता  मुख्य विषयाकडे वळूया, जेव्हा पासून कळायला लागलं तेव्हा पासून ऐकत आलोय मी की हायब्रिड खाल्ल्यामुळे माणसं पहिल्यासारखे मजबूत राहिली नाही, रोगराई वाढली, अशक्तपणा वाढला, अकाली मृत्यू होतात ,पोटात विष तयार होते त्यासाठी गावरान खा. देशी, स्वदेशी बियाणे लावा व ते खा.वगैरे वगैरे..
हायब्रिड खरचं इतकं हानिकारक आहे का ?


वनस्पती चे पुनरुत्पादन लैगिंक, अलैगिंक, व असंगजनन या तीन पद्धतीने होत असते.
नर फुलातील परागकण मादी फुलांच्या स्त्रीकेसराग्रावर पडले म्हणचे परागीभवन होते..
 एका रोपांतील परागकण त्याच फुलातील किंवा त्याच रोपावरील इतर फुलांच्या स्त्रीकेसराग्रावर पडले तेंव्हा त्याला स्वःपरागिकरण म्हणतात. आणि सरळ वाण म्हणजे variety आपण अशी बनवतो की जोपर्यंत पूर्णतः भौतिक,आनुवंशिक शुद्धता येत नाही तोपर्यंत निवड पध्दतीने स्वःपरागिकरण करत राहतो…

एका फुलातील परागकण जेव्हा दुसऱ्या रोपांतील स्त्रीकेसराग्रावर पडतात तेव्हा त्याला परपरागिकरण असे म्हणतात..आणि या पध्दतीने आपण संकरित Hybrid वाण तयार करत असतो. इच्छित गुणधर्मसाठी गरजेचे असलेले नर आणि मादी ची निवड करतो. त्याला 100% शुद्ध बनवतो व नंतर त्यातील नर फुलांचे परागकण त्या मादी स्त्रीकेसराग्रावर टाकतो म्हणजे त्यांचा संकर करतो..
आपणा सर्वांना हे माहितीच अाहे कीवारा,कीटक,पक्षी व माणूस यांच्या मार्फत परागीभवन होत असते..


मग आता हायब्रिड हे फक्त माणसानेच तयार केलंय का ? 
तर नाही, ही एक नैसर्गिक क्रिया आहे. वारा, मधमाश्यां इतर कीटक किंवा पक्षी यांच्या मार्फत जेंव्हा फुलांचे परागीभवन होत असते, तेंव्हा एकाच झाडाच्या नर फुलांचे परागकण त्याच झाडाच्या किंवा सारखे गुणसूत्रे असलेल्या झाडाच्या मादी फुलांवरच बरोबर तो कीटक, पक्षी, वारा जाऊन बसू शकेल काय ??  तर नाही, त्याला इतकी समज नसते किंवा तो काही आपला कामगारही नाही आपले काम करायला… मग होतं असं की तो किटक,वारा,पक्षी एका झाडाचे परागकण घेऊन उडतो आणि वेगवेगळ्या जणूकविधा असलेल्या वेगवेगळ्या झाडावरही बसतो आणि तिथे जेंव्हा फळ तयार होते ते संकरिकरनाच्या व्याख्या नुसार हे पण हायब्रिडच असतं अश्या प्रकारचे हायब्रिड आपण निसर्गतः पूर्वी पासून खात आलोय.


जेंव्हा आपण या क्रियेत उतरलो तेंव्हा फक्त यात आपण आपल्याला पाहिजे ते इच्छित गुणधर्म म्हणजे,पिकांची उत्पादनक्षमतेत वाढ करणे, स्थिर उत्पादन,कृषी विषयक गुणांत सुधारणा, कीड, रोग, बाह्य तानास प्रतिरोध इत्यादी इच्छित गुणधर्मासाठी आपण हायब्रीड वाण तयार करू लागलो.जे खाण्यासाठी हानिकारक नसतात. कोणतेही हायब्रिड तयार केलं की लगेच मार्केट मध्ये आलं असे होत नसते त्यासाठी  वर्षानुवर्षे ट्रायल घेतल्या जातात वेगवेगळ्या विभागाकडून परिक्षण केलं जातं शेतकऱ्यांच्या शेतावर लागवड करून योग्य त्या हायब्रिड वणाला परवानगी दिली जाते..


 फादर मेंडेल यांच्या विभाजनाच्या नियमानुसार दोन गंतुकांचा संयोग होऊन जेव्हा पहिली पिढी (F1 Hybrid) तयार होते तेव्हा त्या नर मादी पितरातली जनुके किंवा आलिले एकमेकांत न मिसळता वेगवेगळी राहतात. आणि दुसरी पिढी तयार होतांना ही जनुके बरोबर वेगवेगळ्या गंतुकात जातात , म्हणजे वेगळी होतात..त्यामुळे आपण संकर केलेल्या नर मादी आपल्याला परत जश्याच तसे मिळवता येतात …


अजून एक गैरसमज की हायब्रीड ला जास्त खत औषधी वगैरे लागतात, त्यावर जास्त रोग येतात वगैरे वगैरे ..
हायब्रिड ला जास्त खत टाकावेच लागते असे काहीच नाही. काहीच खत औषधी न टाकता सुद्धा त्याला फळ फुल लागतात. पण चार पैसे जास्त मिळावे म्हणून टाकलेल्या खताला, चांगले उत्पादन सरळ वाणाच्या तुलनेत फक्त हायब्रीडच देऊ शकते हे सत्य आहे..रोग येण्याला खूप कारणे कारणीभूत असतात. हायब्रीड मुळेच रोग येतो अस काहीच नसतं..

मुळात हा विषय खुप मोठा आहे, एका पोस्ट मध्ये हे सर्व बसवणे शक्य नाही, त्यात मराठी मध्ये लिहणे कठीण जमेल तेव्हडे सोप्याशब्दात सांगायचा प्रयत्न केलाय.. पहिले गावरान वाण चांगले होते, त्यांची चव चांगली होती ते खाण्यासाठी चांगले होते असे आपण म्हणतो तर त्यांचेही संवर्धन झाले पाहिजे ते महत्त्वाचे आहेच.. त्यांचा वापर करूनच रोप पैदासकार समोर ब्रीडिंग करत असतो..
Hybrid ला नाव ठेवणाऱ्या, म्हणजेच नेहमी एका बाजूवर झोपून मेंदु ला अपुरा रक्तपुरवठा झाल्यामुळे पिसाळलेल्या काही लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांसोबत चुकीचा खेळ करु नये ..

वाढत्या लोकसंख्येला पुरेसा आणि संतुलित आहार मिळविण्यासाठी अन्नधान्य उत्पादन सतत वाढवावे लागेल आणि त्यासाठी सुधारित पद्धतीने कृषीतंत्रा सोबतच अधिक उत्पादन देणाऱ्या जाती तयार कराव्या लागतील व त्यांचा वापर करावा लागेल… सतत वाढती लोकसंख्या,निसर्गाची अवकृपा सततचा दुष्काळ कमी होणारे धान्य उत्पादन यांचा विचार केला तर एक वेळ अशी येईल की  खायला काही मिळण्याचे प्रश्न ऊभे राहतील…
उगाच व्यवस्थित अभ्यास न करता कश्यालाही विरोध करू नका.
एवढ्या साठीच हा लेखनप्रपंच…
© गणेश सहाने यांच्या फेसबुक वॉल वरून.

3 COMMENTS

  1. मला याच्या विषय माहिती हवी होती ती मला मिळाली मी
    पण याच मताचा विचार करत आहे

  2. या वरील लेखावरून एवढेच सिद्ध होते की, हायब्रीड लोकसंख्याचे पोट भरण्यासाठी गरजेचे आहे, मग लोकांना त्या भाजी चे जीवनसत्व मिळो की ना मिळो

    दुष्काळात फक्त देशी बियाणे तग धरून उत्पादन देतात. एकीकडे पाऊस कमी होत असून, हायब्रीड ची टाकत कमी पडत आहे. लेखकाने कदाचित या विषयावर प्रयोग न करता, पोकळ व्याख्या केल्या आहेत. जागतिक पातळीवर महत्वाच्या असणाऱ्या देशी बियाणे चे घुमवून फिरवून, विरोध करत असून, हायब्रीड बियनांची जोरात जाहिरात करत आहेत हे सिद्ध आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here