शास्त्रोक्त पद्धतीने रब्बी कांद्याची काढणी व साठवणूक

 • कांदा काढणीच्या 10 ते 15 दिवस आधी जमिनीच्या प्रकारानुसार पाणी देणे बंद करावे.
 • पिकाची काढणी 50 टक्के माना पडल्यानंतर करावी.
 • पाने जास्त वाळू न देता कांदा उपटून काढावा, अन्यथा मान जास्त वाळली तर ती कांदा उपटताना तुटते आणि मग कांदा कुदळीने किंवा खुरप्याने खोदून काढावा लागतो, त्यामुळे खर्च वाढतो.
 • कांदा काढल्यानंतर तो शेतामध्ये पातीसह तीन दिवस सुकण्यास पडू द्यावा. प्रत्येक वाफ्यातील कांदा अशा रीतीने ठेवावा की दुसरी ओळ पहिल्या ओळीचा फक्त कांदा झाकेल आणि पात उघडी राहील.
 • तीन दिवसांनंतर कांद्याची पूर्ण सुकलेली पात 2 ते 2.5 सें.मी. लांब नाळ (मान) ठेवून कापावी. नंतर जोडकांदे, डोंगळे आलेले कांदे आणि चिंगळी कांदे वेगळे करावे. उर्वरित चांगले कांदे गोळा करून सावलीत 10-12 दिवस राहू द्यावेत. या काळात कांद्याच्या माना वाळून पिरगळतात, तसेच वरचा पापुद्रा वाळून कांद्याला घट्ट चिकटतो. वाळलेल्या भागातून रोगजंतूंचा कांद्यात सहजासहजी प्रवेश होत नाही, त्यामुळे अशा प्रकारे वाळवलेला कांदा अधिक चांगला टिकतो.
कांदा पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी गन्ना मास्टर चे कांदा किट वापरा. माहितीसाठी संपर्क 9145019000

कांदा साठवणूक करतांना घ्यावयाची काळजी

 • सुरुवातीला कांदा चाळीचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे, त्यासाठी स्पर्शजन्य बुरशीनाशक (ब्लू कॉपर/कोसाईड/एम -45)+ गॅसपॉयझन युक्त कीटकनाशक (नुवान/क्लोरोपायरीफॉस) प्रमानानुसार एकत्र करून फवारणी करावी व नंतर साठवणूक करावी.

थायोसल्फ सल्फर चे कांदा साठवणुकीसाठी महत्व

शेतकरी मित्रांनो, बहुतांशी शेतकरी चाळीमध्ये कांदा साठवणुकीसाठी सल्फर चा बुरशीनाशक म्हणून वापर मोठ्या प्रमाणात करतात. थायोसल्फ सल्फर 80% WDG हे उकृष्ट स्पर्षजन्य बुरशीनाशक म्हणून काम करते, म्हणून ते चाळीमध्ये येणाऱ्या सर्व बुरशीजन्य रोगांना आटोक्यात ठेवते, परंतु बरेचशे शेतकरी सल्फर चा वापर करत असतांना ते कोणत्या स्वरूपातील आहे याचा विचार न करता कोणत्याही स्वरूपातील सल्फर चा वापर कांदा चाळीमध्ये करतात व अपेक्षित परिणाम मिळत नाही.

मार्केट मध्ये मिळणाऱ्या सल्फर चे प्रकार

 1. बेन्टोनाईट 90% सल्फर
 2. 90% WG फॉर्म मधील सल्फर
 3. 80% WDG फॉर्म मधील सल्फर
 4. 85% डस्टिंग सल्फर

वरील सर्व सल्फर चे काम व वापरण्याची पद्धत वेगवेगळी आहे, बरेच शेतकरी 90% चे फर्टीलायझर म्हणून वापरायचे सल्फर किंवा डस्टिंग सल्फर सुद्धा कांदा चाळीमध्ये बुरशीनाशक म्हणून वापर करत असतात.
बरेच शेतकरी सल्फर मुळे कांद्याचा कलर डाऊन होतो असे म्हणतात, परंतु खराब क्वालिटी व स्वस्त दर असलेल्या सल्फर चा वापर केल्यास कांद्याची क्वालिटी खराब होऊ शकते आणि यात चांगल्या सल्फरचीही बदनामी होते.

थायोसल्फ 80% WDG सल्फरचाच वापर का?????

 1. थायोसल्फ मध्ये उत्कृष्ट प्रतीचे Sticking agent, Spreading agent आणि Dispensing agent (चीपकवनारा पदार्थ, सूक्ष्म कणांना पसरवणारा पदार्थ) वापरले असल्याकारणाने ते चाळीत टाकल्यावर आद्रतेनुसार कांद्यावर पूर्णतः पसरते व स्पर्षजन्य बुरशीनाशक म्हणून उत्कृष्ट काम करते
 2. थायोसल्फ ची पार्टीकल साईज ही 2-4 मायक्राँन असल्यामुळे ते कांद्याच्या पृष्ठभागावर सुंदर पसरते, त्यामुळे कांद्याचा कलर डाऊन होण्याची समस्या कमी होते
 3. थायोसल्फ स्प्रेड्राईंग तंत्रज्ञानाने बनवले जाते म्हणून एकसारखा आकार व प्रत्येक कणाकणात टक्केवारी सारखी मिळण्यास मदत होते
  प्रमाण:- 50 क्विंटल कांद्यासाठी 3 किलो

डॉ. ओमप्रकाश हिरे
मृदा शास्त्रज्ञ
मृगधारा ॲग्रो इंडिया, नाशिक
(Sister company of Agri Search)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here