खोडवा ऊस तोडणी झाल्यानंतर पाचटा मध्ये हरभरा पेरणी कशी करावी

जून 2018 ला को 86032 या वाणाचे 3.5एकर क्षेत्र बियाणेसाठी गेले. जून महिन्यामध्ये तोडणी झाल्यामुळे खोडव्याला आडसाली ऊसा बरोबर दिवस मिळाले.त्या क्षेत्राची तोडणी या वर्षी 2/1/2020ला झाली. खोडव्याचे उत्पादन एकरी 112टन मिळाले.50ते52कांडी पर्यंत ऊसाची वाढ झाली होती.ऊसाची उंची वाडे सोडून 20ते21फूट होती.जास्त उंची वाढल्याने दोन वेळा पाचट काढून सुद्धा सर्वसाधारण खोडव्याला जितके पाचट असते.त्याच्या डबल पाचट निघाले होते.

या क्षेत्रामध्ये पीक फेरपालटसाठी पाचटामध्ये हरभरा करून जून महिन्यामध्ये केळीच्या पिकाचे नियोजन होते.ऊस तोडणी झाल्यानंतर पाचट मशीनच्या सहाय्याने कुट्टी करून घेतले. त्यानंतर सरीवरती एकदा रोटर मारले.पाचट जास्त असल्यामुळे आणखी दोन वेळा उभी आडवी सरी सोडून सरी वरती रोटर मारले.व नंतर खुरुट मारून 20जानेवारी 2020ला हरभरा पेरणी केले. नॉर्मली नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तुटलेल्या ऊसाचा खोडवा असता तर पाचट कुट्टी करून सरी वरती एकदा रोटर मारून हरभरा पेरता आले असते.

यामध्ये एक संकल्पना होती की बेवडसाठी हरभरा करायचा. गरजेनुसार 1/2 पाणी दिल्यानंतर हरभरा घाटा भरून मुजवायला येईल. व पाणी दिल्यामुळे पाचट ही कुजुन जाईल. बेवड ही झाला व पाचटाचे खत झाले. तसेच पाचटामध्ये हरभऱ्याचे पीक कसे येते याचा अनुभव पण मिळेल.

रोटर मारणे,सऱ्या सोडणे,खुरूट मारणे या सर्व मशागती करण्यासाठी 3.5एकर क्षेत्रामध्ये 14000रु चे डिझेल लागले.एकरी 4000रु खर्च आला. स्वतःचा ट्रॅक्टर असल्याने या सर्व मशागती करण्यास परवडले किंवा शक्य झाले.भाड्याने हे सर्व करणे शक्यच नव्हते. मशागत चांगली झाल्यामुळे मातीमध्ये पाचट चांगल्या पद्धतीने मिक्स झाले.त्यामुळे ट्रॅक्टरने पेरणी करताना पाचटाचा काही त्रास झाला नाही.पाचटामध्ये हरभरा पेरणी करायचे असल्याने एकरी 30किलो हरभरा पेरले. हरभरा उगवण चांगली झाली. पाचटा मध्ये माती मिक्स झाल्यामुळे तण अजिबात उगवले नाही. त्यामुळे एकही भांगलन करावे लागले नाही. पहिले पाणी दिल्यानंतर 30 दिवसानी दुसरे पाणी दिले. हरभऱ्याची वाढ भरपूर झाली होती. आणखी थोडे पीक वाढण्यासाठी 3रे पाणी 45 दिवसांनी दिले. तिसरे पाणी दिल्याने हरभऱ्याला काही ठिकाणी गर लागले.दोन पाणी दिले तरी चालले असते.हरभरा मुजवायचा असल्यामुळे कीटकनाशकांचा एकही फवारणी केली नाही. .लेट पेरणी झाल्याने हरभरा पीक घ्यायला परवडणारे नव्हते. काढणी मळणी चा खर्च निघाला नसता,72व्या दिवशी घाटे भरल्यानंतर हरभरा सिंगल पल्टीने मुजवला.दरम्यान संपूर्ण पाचट कुजून त्याचे सेंद्रिय खत झाले होते. नांगरट करते वेळी ट्रॅक्टर चालविताना ट्रॅक्टर सहजपणे जात होता. चाके अजिबात स्लिप होत नव्हते. पाचटामध्ये हरभऱ्याचे पीक घेतल्यामुळे जमीन एकदम भुसभुशीत झाली होती. जमिनीला फुल आलेलं होत त्यामुळे नांगरट करत असताना ट्रॅक्टर सहज जात होता. हरभरा नांगरट पहिल्यांदाच बिन त्रासाची होत होती. हे सर्व पाचटाची कमाल होती. पाचट कुजून गेल्याने जमिनीमध्ये त्याचे अवशेष अजिबात दिसत नाहीत.पाचट गाडून त्यामध्ये हरभरा केलेला होता असे कुणाला सांगितले तर विश्वास बसणार नाही.

त्याला लागूनच माझे 5.5एकर क्षेत्र आहे.त्यामध्ये केळीचे लावण/खोडवा घेऊन डिसेंबर महिन्यामध्ये हरभरा केलेला होता.ते शेत नांगरट करत असताना इतका त्रास झाला की सिंगल पल्टी वरती पाच माणसे उभा करून नांगरट करावी लागली.पल्टी वरती माणसे उभा केल्याशिवाय नांगर लागतच नव्हता

पहिली नांगरट केल्यानंतर 21 दिवसांनी रोटर मारले. रानाची एकदम तालीम झाली आहे. थोडं जरी चाललं तरी पाय भरून येतात. मित्रानो चांगल्या उत्पादनाचा राजमार्ग हा जमीनीच्या पूर्व मशागतीमधून जात असतो.

त्याक्षेत्रा मध्ये जून महिन्यात जैन G9 टिश्यूकल्चर केळीची लागवड करणार आहे.त्यासाठी शेणखत टाकून. खुरूट मारून दुसऱ्यांदा नांगरट सुरू आहे. त्यानंतर 3.5फुटी सरी सोडून 15/20दिवस सरी वरती जमीन तापवून सरी वरती रोटर मारून मे महिन्याच्या शेवटच्या 6 फुटी सरी सोडून 6/5फूट या अंतरावर जून महिन्यामध्ये केळी लागवड करायचे आहे.

Posted by Suresh Kabade on Monday, 4 May 2020

श्री. सुरेश कबाडे.
प्रबंधक, होय आम्ही शेतकरी समूह,
रा.कारंदवाडी ता:-वाळवा जि:-सांगली मोबा:- 9403725999

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here