होय आम्ही शेतकरी- मार्केट पाहणी अहवाल

* ८ महिन्याच्या हंगामात देशात एकूण जवळपास २६८.२१ लाख टन साखर तयार झाली आहे. ही मागील हंगामापेक्षा जवळजवळ ५९ लाख टन कमी आहे.

* यात सर्वाधिक साखर उत्तर प्रदेश मध्ये बनली ज्यात १२५.४६ लाख टन इतका वाटा उत्तर प्रदेशचा आहे.

* यावर्षी महाराष्ट्रात फक्त ६०.९८ लाख टन इतकिच साखर बनू शकली.

* एम्फन वादळामुळे बंगाल आणि ओदिशा मध्ये भाजीपाला विशेषतः बटाटा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे आणि मजूर उपलब्ध नसल्याने कोल्ड स्टोरेज मधील माल ही बाहेर निघत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भाव वाढत आहेत.

* तांदळा नंतर आता मक्यापासून इथेनॉल निर्मितीची शिफारस कृषी मूल्य आयोगाने केली आहे जी लवकरच मंजूर होण्याची शक्यता दाट आहे.

* सध्या मका हमीभावापेक्षा खूप लोववर विकत आहे. यावर्षी देशभरात मका उत्पादन जवळपास २८४ लाख टन आले आहे.

* अमेरिका त्यांच्या एकूण इथेनॉल उत्पादनापैकी एक तृतीयांश इथेनॉल मका पासून बनवते.

* २०२०-२१ च्या ऊस हंगामाची एफ आर पी वाढून २८५० टन होण्याची शक्यता आहे. याची लवकरच घोषणा होईल.

* २०१०-११ च्या हंगामात ऊसाचा एफआरपी दर जवळपास १३९१ रु होता तो आता २८५० रु टना पर्यंत पोचेल.

संकलन:
-इरफान शेख, ३ जून २०२०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here