खाद्यतेलावर येणार ‘जीएम’ टॅग

भारतात आयात होणाऱ्या जीएम (GM) खाद्यतेलाच्या पाऊच किंवा बाटलीवर ‘जीएम असा उल्लेख बंधनकारक होणार आहे. (GM – जनुकीय स्थानांतरीत)

भारताची सोयातेलाची वार्षिक गरज आहे सुमारे 50 लाख टन. सुमारे 15 लाख टन स्थानिक उत्पादन आहे, तर उर्वरित 35 लाख टन सोयातेल लॅटिन अमेरिकी देशांकडून आयात केले जाते. बहुतांशी हे क्रूड सोया तेल असते. देशातील मिल्समध्ये प्रोसेस करून रिफाईन तेल विविध ब्रॅंडनेमने विकले जाते.

भारतातील सरकी तेल वगळता अन्य खाद्यतेेल हे सरळ वाणापासून (Non GMO) निर्मित आहेत. परदेशातील फूड्स पॅकेट्सवर नॉन जीएमओ किंवा जीएमओ असा उल्लेख असतो.

वरील निर्णयामुळे काय बदल होईल?

ग्राहकाला कळेल की आपण नॉन जीएमओ तेल खातोय की जीएमओ. त्याच्या पसंतीनुसार तो निवड करू शकेल. शक्यता अशी आहे, की भारतीय नॉन जीएमओ खाद्यतेल हे जीएमओच्या तुलनेत थोडाफार प्रिमियम रेटने विकले जावू शकतील. सरळ वाणांच्या तेलबिया शेतीला आधार मिळेल.

पारंपरिक पद्धतीने, कच्ची घाणी आदी उद्योगांनासाठीही ही सकारात्मक बातमी आहे. त्यांना आपले ब्रॅंडींग जोरदार पद्धतीने करता येईल.

जीएमओ खाद्यतेल हे आरोग्यासाठी चांगले किंवा वाईट, असे या पोस्टमधून प्रसारित करायचे नसून, निर्णय काय झाला आहे, हे सर्वांपर्यंत पोचावे, असा उद्देश आहे. जैवइंधने, कॅटल फीड आदी कारणांसाठी विकसित देशांत जीएमओ पिके घेतली जात असून, भारतातही वरील कारणांसाठी जीएमओ पिकांना मंजूरी दिली पाहिजे, असे माझे मत आहे.

त्याच बरोबर ग्राहकांकडून जर नॉन जीएमओ, ऑरगॅनिक उत्पादनांची मागणी होत असेल, तर तसा पुरवठा झाला पाहिजे.

केंद्र सरकारने जीएमओ असा टॅग वापरा असे निर्देश देऊन एक चांगले पाऊल टाकले आहे.

  • दीपक चव्हाण, ता. 21 जून 2021.

(आकडेवारी स्त्रोत – SEA).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here