आधी जन्म कोरोना चाचणी किटचा, नंतर पोटातल्या बाळाला

पुणे : देशात कोरोना चाचणींचं प्रमाणा आता मोठ्या प्रमाणात होणार आहे, कारण, कोरोना चाचणीचं किट्स पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने विकसित केलं आहे. विशेष म्हणजे हे किट्सचा श्रेय एका मराठमोठ्या महिलेला जातं. खूप कमी वेळात आणि स्वस्तात हे किट्स विकसित करण्यात आले आहे. जगभरात असे किट्सचे उत्पादन करण्याची परवानगी केवळ नऊ कंपन्यांना आहे. त्यामध्ये भारतातील या एकमेव कंपनीचा समावेश आहे. या कंपनीकडून आत्ता दररोज दहा हजार किट्सची निर्मिती करण्यात येत आहे. आगामी काळात त्यामध्ये वाढ करून दररोज पंचवीस हजार किट्स तयार करण्यात येणार आहेत.

कोरोना विषाणूची साथ महाराष्ट्रात पसरायला सुरुवात झाली तेव्हा मीनल डाखवे-भोसले ह्या साडेसात महिन्याच्या गर्भवती होत्या. कोरोना देशाच्या कानाकोपऱ्यात पसरायला सुरुवात झाली होती. पुरेशा टेस्टिंग लॅब नसल्यानं अडचण मोठी होती. त्यातही इंम्पोर्टेट किटमधून केलेल्या टेस्टचा रिझल्ट यायला 6 ते 7 तास लागायचे. त्यामुळे देशातील 118 लॅब्जवर जवळपास 130 कोटी जनतेचा भार होता. हीच अडचण ओळखून पिंपरी-चिंचवडच्या मायलॅबनं संशोधन सुरू केलं. तेही कोविड 19 च्या टेस्टिंग किटचं. त्याचं नेतृत्व करत होत्या मीनल.

अवघ्या 1200 रुपयात कोरोना चाचणी
मीनल यांनी बनवलेल्या किटमुळे अवघ्या 1200 रुपयात कोविड 19 ची टेस्ट होते. परदेशातून आयात केलेल्या किटच्या मदतीनं टेस्ट करायला 4500 रुपये लागतात. मीनल यांच्या किटमध्ये झालेल्या टेस्टचा रिझल्ट अवघ्या अडीच तासात येतो. परदेशातून आयात केलेलं किट टेस्टचा रिझल्ट द्यायला सहा ते सात तास घेतात. मीनल यांनी बनवलेलं किट एकाचवेळी 100 टेस्ट करण्याइतकं सक्षम आहे. मायलॅबनं तयार केलेल्या किटला आयसीएमआरनं मान्यता दिलीय. भारतीय कंपनीनं तयार केलेलं आणि 100 टक्के अचूक रिझल्ट देणारं एकमेव किट असल्याचंही आयसीएमआरनं म्हटलंय.

1 COMMENT

  1. Salute to her dedication. Not every person need to fight on borders to prove their patriotism. Thanks for such a needful invention from all mankind.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here