अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा, गोरगरीब जनता, कामगारांना 1 लाख 70 हजार कोटी.

देशातल्या 80 कोटी नागरिकांसाठी मोठी घोषणा, 5 किलो गहू किंवा तांदुळ मिळणार, शिवाय 1 किलो डाळ मिळणार.

पंतप्रधान किसान पहिला हप्ता तातडीने हस्तांतरित करण्यात आला. यातून 8.3 कोटी शेतकर्‍यांना लाभ मिळणार आहे. जवळपास 2 हजार कोटी रुपये ट्रान्सफर केले जाईल.

20 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 50 लाखांचा आरोग्य विमा, आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखांचा मेडिकल कव्हर.

उज्ज्वला लाभार्थ्यांना पुढील 3 महिन्यांसाठी मोफत एलपीजी सिलिंडर मिळतील .. 8.3 कोटी बीपीएल कुटुंबांना लाभ होईल

60 वर्षापेक्षा जास्त वयाची विधवांना आगामी दोन महिन्यांसाठी १००० रुपयांची मदत दिली जाईल, 3 कोटी गरीब ज्येष्ठ नागरिक, विधवा व दिव्यांगांना लाभ होईल.

जनधन योजनेंतर्गत २० कोटी महिला खातेधारकांना महिना ५०० रुपये देण्यात येणार.

वृद्ध, दिव्यांग, पेन्शनधारकांना पुढील तीन महिने १००० रुपये देण्यात येणार आहेत. ३ कोटी लोकांना फायदा.

बचत गटाच्या महिलांना कोणतीही संपत्ती तारण न ठेवता मिळणारे कर्ज दुपटीने वाढविले. आता २० लाखांचे कर्ज मिळणार. ७ कोटी महिलांना फायदा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here