शेतकरी उत्पादक कंपन्यांना मिळणार 5 लाखाचं कर्ज अन् ‘ही’ सूट देखील

FPO

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत देशातील अनेक बँका शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पैसे देत आहेत. बँक ऑफ बडोदाने देखील या समस्येवर मात करण्यासाठी शेतकरी उत्पादक संस्था – एफपीओसाठी आपत्कालीन क्रेडिट लाइनची घोषणा केली आहे. या शेतकरी उत्पादक कंपन्यांना 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते त्याचसोबत त्यांना कर्ज परत फेड करताना देखील अनेक पद्धतीने सुट दिली जाणार आहे.

महिला बचत गटांना बँक ऑफ बडोदा 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देणार आहे. मंगळवारी बँकेने याबाबत माहिती दिली. SHGs-COVID-19 योजनेंतर्गत बँक सध्याच्या बचत गटांना रोख क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्ट किंवा मुदतीच्या कर्जाच्या स्वरूपात मदत करणार आहे.

अशाप्रकारे मिळेल शेतकऱ्यांना सहजपणे कर्ज

बँक ऑफ बडोदाने जारी केलेले निवेदनात सांगितले आहे की, एका बचतगटाला किमान 30,000 रुपयांचे कर्ज दिले जाईल. जास्तीत जास्त कर्ज प्रति सभासद 1 लाख रुपये आहे. ते 24 महिन्यांत परत करावे लागेल. या योजनेंतर्गत मासिक किंवा तीन महिन्यांच्या आधारे परतफेड करण्यात येईल.

त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीओसाठी) 10 टक्के लोन कलेक्टिव लिमिट मंजूर केले जाईल, जे 36 महिन्यांच्या कालावधीसह जास्तीत जास्त 5 लाख रुपये असू शकते. यामधील अधिस्थगन कालावधी 6 महिन्यांचा असेल.

आपत्कालीन निधीच्या गरजा भागविण्यासाठी, दुग्धव्यवसाय व मत्स्यपालक असलेल्या शेतकऱ्यांना बँक त्वरित क्रेडिट देईल. जे त्यांना शेतीच्या देखभाल व शेतीशी संबंधित इतर कामे करण्यास मदत करेल. या योजनेंतर्गत कर्जाची मर्यादा किसान क्रेडिट कार्डसाठी मंजूर केलेल्या मर्यादेच्या 10 टक्के असेल जी किमान 10 हजार रुपये आणि जास्तीत जास्त 50 हजार रुपये असू शकते.

मोदी सरकारने 10,000 शेतकरी उत्पादक संस्थासाठी (एफपीओ) ही योजना सुरू केली आहे. जे शेतकरी आतापर्यंत केवळ उत्पादक होते ते आता शेतीशी संबंधित व्यवसाय एफपीओमार्फत करतील. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेचा 30 दशलक्ष शेतकर्‍यांना थेट लाभ होणार आहे.

चौधरी यांच्या मते, प्रत्येक संस्थेस 15 लाख रुपयांपर्यंतचे इक्विटी अनुदान दिले जाईल. या योजनेत सन 2024 पर्यंत दहा हजार शेतकरी उत्पादक संस्था स्थापन केल्या जातील, त्याकरिता 6865 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

शेतकरी उत्पादक संस्था कशी व्हावी –

हा एक शेतकर्‍यांचा गट असावा ज्यामध्ये कमीतकमी 11 सदस्य असतील. त्याची कंपनी कायद्याने नोंदविली जाईल. मोदी सरकार जे 15 लाख रुपये देण्याबद्दल बोलत आहे, त्याचा फायदा कंपनीचे काम पाहिल्यानंतर तीन वर्षांत दिला जाईल.

येथे मिळेल सहकार्य-

जर तुम्हाला एफपीओ बनवायची असेल तर आपण राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, लघु शेतकरी कृषी- व्यवसाय कन्सोर्टियम आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (एनसीडीसी) च्या कार्यालयात तुम्ही संपर्क साधू शकता. आपल्याला जर शेतकरी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करायची असेल तर आपण पुढील मो. वर संपर्क करू शकता स्वप्नील बोरावके, ९५२७५०१५०७

सदस्य शेतकऱ्यांना कसा फायदा होईल –

राष्ट्रीय शेतकरी महासंघाचे संस्थापक सदस्य विनोद आनंद यांच्या मते, एफपीओमध्ये सामील झाल्याने शेतकर्‍यांची सामूहिक शक्ती वाढते. कारण कोणत्याही उत्पादनाची खरेदी-विक्री एकत्रितपणे बार्गेनिंग होते. शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनांचा चांगला भाव मिळतो, ज्यामुळे त्यांना खत, बियाणे, औषधे आणि शेती उपकरणे इत्यादी खरेदी करणे सुलभ होते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here