इथेनॉलसाठी गाळप होणाऱ्या ऊसाचा भाव नेमका कसा ठरणार याबाबत साशंकता

शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाला मिळणारा दर त्यांच्या ऊसतील साखरेच्या प्रमाणावर म्हणजेच ऊसाच्या रिकव्हरीवर निर्धारित असतो. अर्थात हे सगळं आता फक्त कागदावर उरले आहे. ऊसा पासून उत्पादित होणाऱ्या प्रत्येक पदार्थच्या उत्पन्नवर शेतकऱ्यांना वाटा असायला हवा या साठी RSF उर्फ रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला राज्याने मान्य करत ऊसाची किमान FRP अधिक उत्पन्नचा वाटा अशा प्रकारे ऊसाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा हे ठरले !

आता ऊसा पासून थेट ईथेनॉल निर्मिती करण्याची तयारी अनेक साखर कारखाने करत असतांना ऊसाचा दर कसा निघणार ?? या बद्दल कोणीही ठोस भूमिका घेतांना दिसत नाही हे आश्र्चर्यकारक आहे , सर्वात मजेचे म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी देखील निवांत आहे , त्यांना वाटत असावे कोणी तरी पुढे येईल आणि भांडत बसेल , नेहमी प्रमाणे !

आता पोस्ट लिहिण्याचे कारण म्हणजे ऊसा पासून इथेनॉलची रिकव्हरी किती वगैरे ठरविण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अहवाल तयार करणार म्हणतात , आता ही इन्स्टिट्यूट कोणाची हे सर्वांना माहीत ! खरे तर हे संशोधन करण्यासाठी I.I.T या संस्थेला देखील सहभागी करून त्यांचा स्वतंत्र अहवाल घेतला पाहिजे. यंदाच्या हंगामात महाराष्ट्र राज्याची सरासरी साखर रिकव्हरी किती या बद्दल कोण साधी माहिती तरी घेतली का ?? यंदा सरासरी रिकव्हरी कमी कशी व का झाली आहे ?

खर म्हणजे बहुतांश ऊस उत्पादकांचे पोट गच्च भरलेले असावे दिसतंय , त्यांना या विषयी काहीही देणे घेणे नसावे..

मात्र इतकं लक्षात ठेवा , जे काही आता ठरेल ते कायमस्वरूपी
मानगुटीवर राहील , मग कितीही बोंबल तरी काहीही होणार नाही. १% रिकव्हरी चोरली तर टनाला ३०० रु फरक पडणार आहे इतकं लक्षात असू द्या .. जागृत व्हा , संघटित व्हा..

@ऍड योगेश पांडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here