पीएम-जीकेवाय अंतर्गत राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 13.4 कोटी लाभधारकांना 1.78 लाख मेट्रिक टन डाळींचे वाटप


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लॉकडाऊन कालावधीत 9.67कोटी शेतकऱ्यांना 19,350.84 कोटी रुपये वितरीत

पीएम-जीकेवाय योजनेंतर्गत डाळींचे वाटप

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत (पीएम-जीकेवाय) राज्य/केंद्रशासित प्रदेशांना सुमारे 4.57 लाख मेट्रिक टन डाळ पाठविली आहे. राज्य/केंद्रशासित प्रदेशातील 1340.61 लाख लाभार्थ्यांना यापैकी 1.78 लाख मेट्रिक टन डाळींचे वाटप करण्यात आले आहे.

लॉकडाऊन कालावधीत नाफेड कडून डाळी आणि तेलबियांच्या खरेदीची स्थिती:

  • आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश आणि हरियाणा या 9 राज्यांमधून 7.33 लाख मेट्रिक टन चण्याची खरेदी करण्यात आली आहे.
  • राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात आणि हरयाणा या 5 राज्यांमधून 5.91 लाख मेट्रिक टन मोहरी खरेदी केली आहे.
  • तामिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात आणि ओदिशा या 8 राज्यांमधून 2.41 लाख मेट्रिक टन तूर खरेदी केला आहे.

रब्बी विपणन हंगामात गव्हाची खरेदी

रब्बी विपणन हंगाम (आरएमएस) 2020-21 मध्ये एफसीआय मध्ये एकूण 359.10 लाख मेट्रिक टन गव्हाची आवक झाली असून त्यापैकी 347.54 लाख मेट्रिक टन खरेदी झाली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत 24 मार्च 2020 पासून आतापर्यंत लॉकडाऊन कालावधीत 9.67 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून आतापर्यंत 19,350.84 कोटी रुपये वितरीत केले आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here