जीवाणू संवर्धकाचा पीक उत्पादन वाढीमध्ये वापर

रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती, बाजारपेठेत होत असलेली त्यांची दुर्मिळता लक्षात घेता शेतकऱ्यांनी अपेक्षित कृषी उत्पादन वाढविण्यासाठी जीवाणू संवर्धनाचा वापर करणे ही काळाची गरज आहे. जीवाणू संवर्धने स्वस्त किंमतीत उपलब्ध होत असल्याने सर्वच शेतकऱ्यांना परवडण्यासारखी आहेत. तसेच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी त्यांची मदत होते. जीवाणू संवर्धने जमिनीत आढळणाऱ्या उपयुक्त जीवाणूपासून तयार केलेली असतात. त्यापैकी अॅझोटोबॅक्टर, अझोस्पीरिलम, निळी-हिरवी शेवाळे आणि ऍ़झोला पिकास नत्र पुरवितात. बॅसीलस पॉलिमिक्स जीवाणू स्फुरदाची उपलब्धतावाढवितात तर मायकोराईझा सारखे जीवाणू पिकास स्फुरद, पालाश, नत्र, कॅल्शियम, सोडियम, जस्त, तांबे, यासारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषण करण्यास मदत करतात. यापैकी अॅझोटोबॅक्टर आणि रायझोबियम ही संवर्धने प्रचलित झाली असुन इतरांच्या अधिक वापरासाठी कृषि खाते व कृषि विद्यापीठे प्रयत्नशील आहेत. जीवाणू संवर्धनाचा निरनिराळ्या पिकांसाठी वापर आणि उत्पादनात होणारी वाढ खालील तक्त्यामध्ये दर्शविली आहे.

जीवाणू संवर्धनाचे प्रकार, त्यांचा वापर व उत्पादन वाढीवर होणारा परिणाम

अ.क्र.जिवाणू संवर्धनाचा प्रकारपिकांसाठी वापरउत्पादनात होणारी वाढ (टक्के)
.अझॅटोबॅक्टरएकदल पिके : उदा. ज्वारी, 
बाजरी, गहू
१४ ते ३३
.रायझोबियमद्विदल पिके : उदा. तूर, उडीद, 
सोयाबीन, मूग, हरभरा, भूईमुग 
१९ ते ६२
.अॅझोस्पीरीलमज्वारीबाजरीमकागहूभात१५ ते २०
.निळीहिरवी शेवाळभात१० ते १५
.अॅझोलाभात१२ ते ५१
.व्हिएमायकोराईझाबाजरीज्वारीमकातूरभुईमुग२२ ते २५

जीवाणू खत (संवर्धन) वापरण्याची पध्‍दतअझॅटोबॅक्टर अथवा रायझोबियम जीवाणू संवर्धन वापरायचे असल्यास संवर्धनाचे १ पाकीट (२५० ग्रॅम) हे ५०० मि.ली (अर्धा लिटर) पाण्यात मिसळून द्रावण करावे. हे द्रावण बियाणांवर शिंपडून हलक्या हाताने चोळावे. जीवाणू संवर्धन लावलेले बियाणे स्वच्छ कागदावर किंवा पोत्यावर सुकवावे आणि लगेच पेरणीसाठी वापरावे. एका पाकीटातील संवर्धन (२५० ग्रॅम) १० ते १५ किलो बियाणांवर प्रक्रिया करण्यास पुरे होते. गुळाचे पाणी (५० ते १०० ग्रॅम गुळ अधिक ५०० मि.ली. पाणी) चिकट होत असल्यामुळे जास्त परिणामकारक ठरते.


जीवाणू खत (संवर्धन) वापरण्याच्या पध्‍दत१) ऊसाची एक एकर लागवण करण्यासाठी ५० लिटर अॅसीटॉबॅक्टरची ८ पाकीटे आणि स्फुरद विद्राव्य जीवाणूंची (पीएसबी) ८ पाकीटे मिसळून द्रावण तयार करुन ऊसाच्या कांडया या द्रावणामध्ये बुडवून लगेच लावणी करावी.२) बटाट्याच्या एक एकर लागणाऱ्या बेण्यासाठी अॅझोटोबॅक्टरची ८ पाकीटे व स्फुरद विद्राव्य जीवाणूंची (पीएसबी) ८ पाकीटे ५० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे व द्रावणात बेणे बुडवून लावणी करावी.३) हळद, आले (अद्रक) चे एक एकरा करीता लागणाऱ्या बेण्यासाठी अॅझोटोबॅक्टरची ८ पाकीटे व स्फुरद विद्राव्य जीवाणूंची (पीएसबी) ८ पाकीटे ५० लिटर पाण्यात मिसळून द्रावणात बेणे बुडवून लागवड करावी.४) मिरची, तंबाखू, कांदा, फळे आणि भाजीपाला पिकांसाठी अॅझोटोबॅक्टरची १० पाकीटे आणि स्फुरद विद्राव्य जीवाणूंची (पीएसबी) १० पाकीटे २० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. रोपाची लावणी करते वेळी रोपाची मुळे या द्रावणामध्ये ५ मिनीटे बुडवून नंतर लावणी करावी.

जीवाणू खते वापर विषयक शिफारशी १) मराठवाडा विभागातील किफायतशीर ज्वारी – हरभरा उत्पादन, जमिनीची सुपिकता व जैविक विविधता टिकविण्यासाठी ज्वारी (८०:४०:४० नत्र, स्फुरद आणि पालाश किलो प्रति हेक्टरी) व हरभरा (२५:५०:०० नत्र, स्फुरद आणि पालाश किलो प्रति हेक्टरी) पिकास १०० टक्के शिफारस केलेली मात्रा द्यावी. तसेच ज्वारी पिकास अझोस्पीरिलम व स्फुरद विद्राव्य जीवाणू संवर्धनाची आणि हरभरा पिकास रायझोबियम व स्फुरद विद्राव्य जीवाणू संवर्धनाची एकत्रित (२५० ग्रॅम प्रत्येक जिवाणू संवर्धन प्रति १ किलो बियाणास) बिजप्रक्रिया करावी, अशी शिफारस करण्यात येते.

२) मराठवाडा विभागातील किफायतशीर सोयाबीन – करडई उत्पादन, जमिनीची सुपिकता व जैविक विविधता टिकविण्यासाठी सोयाबीन (३०:६०:३० नत्र, स्फुरद आणि पालाश किलो प्रति हेक्टर) व करडई (२०:४०:०० नत्र, स्फुरद आणि पालाश किलो प्रति हेक्टरी) पिकास १०० टक्के शिफारस केलेली खताची मात्रा द्यावी, तसेच सोयाबीन पिकास रायझोबियम व स्फुरद विद्राव्य जिवाणू संवर्धनाची आणि करडईस अॅझोटोबॅक्टर व स्फुरद विद्राव्य संवर्धनाची (२५० ग्रॅम प्रत्येक जीवाणू संवर्धनाची प्रति १० किलो बियाणास) एकत्रित बिजप्रक्रिया करावी.

तक्ता : रायझोबियमचे वर्गीकरण :

घटकरायझोबियमब्रॅडी रायझोबियमअझोरायझोबियम
वाढीचा दरजलद वाढते१ मिमी वाढीसाठी २ दिवस लागतात.
 एक पिढीचा काळ २.५ ते ४ तास असतो.
हळू वाढते मिमी वाढीसाठी  ते १० दिवस लागतातएक पिढीचा काळ  ते १३ तास असतो.जलद वाढते मिमी वाढीसाठी दोन दिवस लागतात. एक पिढीचा काळ  तास असतो.
केसाळ अवयवसंपूर्ण पेशीभोवतीएक केस पेशीच्या टोकाला अथवा थोडे आतील बाजूससंपूर्ण पेशीभोवती केसाळ अवयव असतात
डीएनए मधील जीसी (टक्के)५९  ६४६२  ६६६६
स्वतंत्र स्थितीतील नत्र स्थिरीकरणस्वतंत्र स्थितीत राहते पण नत्र स्थिर करत नाही.कमी प्राणवायू असणाऱ्या ठिकाणी नत्रस्थिर करते पण पेशी बांधणीसाठी वापरत नाहीत.स्वतंत्र स्थितीत नत्रस्थिर करतात  पेशी बांधणीसाठी वापरु शकतात
कार्बोदकाचा वापरपेप्टोजेसडेक्झोजेसमोनो डाय  ट्राय साखर वापरतातपेप्टोजेसहेक्झोजेस पूर्णपणे वापरतातग्लुकोज व्यतिरिक्त कोणतीही साखर वापरत नाहीत.

 मायकोरायझा- मायकोरायझा याचा शब्दश: अर्थ ‘कवक मुळे’ असा आहे. मायकस म्हणजे ‘कवक’ व रायझा म्हणजे ‘मुळे’ पिकाच्या मुळाशी सह्योगी पध्‍दतीने व पिकाला उपयोगी पडणाऱ्या बुरशीला मायकोरायझा म्हणतात. बहुतेक सर्व पिकांना व फळझाडांना व्हेसिक्युलर अर्ब्यूस्कुलर मायकोरायझा (व्हॅम) जीवाणू फायदेशीर असतात. बऱ्याच जमिनीत कमी अधिक कार्यक्षमतेचे हे जीवाणू असतात. रोपांच्या मुळाभोवती या बुरशीची वाढ होते. त्याचा काही भाग मुळामध्ये प्रवेश करुन पेशीमध्ये जातो व मुळाबाहेरील भागाची वाढ होऊन बुरशीचे धागे मुळाभोवतालच्या मातीमध्ये लांबपर्यंत पसरतात. त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्ये शोषून घेण्याचा पृष्ठभाग मोठ्या प्रमाणात वाढतो. मुळाभोवती हे जिवाणू उपलब्ध असल्याने स्फुरद, गंधक, कॅल्शियम, लोह, झिंक व तांबे इत्यादी अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणात शोषूण घेतात. त्यामुळे पिकांना अन्नद्रव्ये व पाणी जास्त प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे पिकांची वाढ चांगली, निरोगी, भरघोस व दर्जेदार होते. फुले धारण करणाऱ्या बहुतेक सर्व पिकांमध्ये ‘व्हॅम’ मायकोरायझाचा उपयोग होतो. काही पिकांमध्ये व्हीएमायकोराझा पिकाच्या मुळावर वाढतात तर काहीमध्ये मुळावर व मुळामध्ये असे दोन प्रकारे वाढते.

जीवाणू संवर्धन वापरतांना घ्यावयाची काळजी·

  • जीवाणू संवर्धनाच्या पाकिटावर नमूद केलेल्या पिकांसाठी सूचनेप्रमाणे अंतिम दिनांकापूर्वी वापरावीत.     
  • बुरशीनाशके अथवा किटकनाशके लावावयाची झाल्यास ती अगोदर लावावीत. नंतर जीवाणू संवर्धन बियाण्यास लावावे.         
  • जीवाणू संवर्धन अथवा संवर्धनाची प्रक्रिया केलेले बियाणे खतात मिसळू नये.
  • जीवाणू संवर्धन खरेदी करताना वापरासंबंधी अंतिम तारीख तसेच पिकाचे नाव पाहूनच खरेदी करावे व पाकिटास सावलीत थंड जागी ठेवावे.
  • रायझोबियम हे वेगवेगळ्या व्दिदल पिकासाठी वेगवेगळे असते.
  • टिप – जीवाणू संवर्धनाचा वापर विविध पिकांमध्‍ये करतांना कृषि तज्ञांशी सल्‍ला घ्‍यावा.

संदर्भ – कृषि दैनंदिनी, परभणी कृषी विद्यापीठ 2016, वनामकृवि, परभणी पान नं. 56-58

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here