About Us

ऊस-सम्राट ऊसपीक चर्चासत्र

होय आम्ही शेतकरी” समूह हा महाराष्ट्रातील अग्रगण्य शेतीविषयक कार्यकर्त्यांचा समूह आहे. महाराष्ट्रातील प्रमुख पिकांसंबंधी इथंभूत माहिती या समूहामार्फत दिली जाते. तसेच पुर्वीच्या अभ्यासकांचे शेतीविषयीचे विचार आणि सरकारची आताची धोरणे याची चिकीत्सा केली जाते. शासनाच्या विविध योजनांची माहिती, त्याचे फायदे-तोटे, प्रक्रिया या गोष्टींविषयी सविस्तर मार्गदर्शन या ग्रुपमधील शेतीतज्ञ देत असतात. शेतभेटी,व्हाट्सएप मेसेजस,फेसबुक लाईव्हद्वारे थेट शेतातून शेतीविषयक सल्ले, मार्गदर्शन केले जाते . त्यामुळे विनामूल्य मिळणाऱ्या माहितीचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत आहे.

आमची टीम

डॉ. अंकुश चोरमुले (कीटकशास्त्र) डॉ. ओमप्रकाश हिरे (मृद विज्ञान), डॉ. विश्वाजीत कोकरे (मृद विज्ञान), श्री. गणेश सहाणे,  श्री. रोहित डुबे, श्री. शरद अवटी, राजू गाडेकर,विजय पवार, इरफान शेख हे कृषी क्षेत्रातील तज्ञ तर अमोल पाटील, प्रकाश खोत, सुरेश कबाडे,विजय मगदूम,प्रसाद पवार,प्रसाद सभासद,सुरज चाळके,कृष्णात पाटील, सूर्यकांत दोरुगडे,विनोद चव्हाण,सुजय कुमठेकर.

डॉ. अंकुश जालिंदर चोरमुले  हे कीटकशास्त्रात पीएचडी असून ऊस उत्पादक शेतकरी आहेत. त्यांनी महाराष्ट्रामध्ये मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव सर्वप्रथम नोंद केला आहे.सध्या  ते लष्करी अळीचे व्यवस्थापन कसे करावे या बाबत संशोधन करत आहेत

श्री अमोल राजन पाटील उच्च शिक्षित प्रगतीशील शेतकरी व्यवस्थापन पदवीउत्तर व वकिली शिक्षण घेतले आहे.
ऊसात सातत्याने एकरी १०० टन उत्पादन घेत आहेत. होय   आम्ही शेतकरी  स्थापना त्यांनी केली असून आज तो वटवृक्ष बनला आहे

 

 

 

डॉ. विश्वजित कोकरे हे मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र या विषयात पीएचडी व नेट असुन. पिकांच्या वाढीच्या अवस्थे नुसार पिकांची अन्नद्रव्य आवश्यकता पूर्ण करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान (ब्लेंडेड फर्टिलायझर ) विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञा सोबत संशोधन करत आहेत.