7/12 म्हणजे काय?

बँकेत कर्ज प्रकरण करण्यावेळी किंवा इतर जमिनीचे व्यवहार करताना सातबारा हे शब्द आपल्या कानावर नेहमी पडत असतात. सात बारा हा जमिनीची निगडित शब्द आहे. पण याचा काय अर्थ असतो. सातबारा म्हणजे जमीन का शेत काय असतो याचा अर्थ. आज आपण या शब्दाचा अर्थ जाणून घेणार आहोत. तलाठ्याकडे जमिनी संदर्भातील रेकॉर्ड असते त्यात कमीत कमी शब्दात व विशिष्ट मांडणीत असलेला तपशील म्हणजे सातबारा होय. जमिनीची माहिती यामध्ये दिलेली असते त्याला गाव नमुना असे म्हणतात.

गाव नमुना ठेवण्यासाठी 1-21 अशी विभागणी असते. त्यातील 7 नंबरचा नमुना हा मालकी हक्काबाबत असतो तर 12 नंबर मध्ये पिकांबाबत माहिती दिलेली असते. या दोन्ही प्रकारच्या माहितीचे एकत्रीकरण हे सातबारामध्ये केलेले असते. जमिनीचे सातबारा आणि त्याचे योग्य नियोजन आणि नोंद ठेवण्याचे काम तलाठीकडे असते.

7 -12 च्या संबंधित महत्त्वाच्या बाबी

सातबारा उतारा हा जमीन मालकी हक्काचा प्राथमिक व अंतरिम पुरावा असतो.

सातबारा उतारा हा जोपर्यंत बेकायदेशीर आहे असे ठरवले जाते तोपर्यंत तो कायदेशीर मानला जातो.

सातबारामध्ये पीक पाहणी नोंद केलेली असते ते दरवर्षी केली जाते.

 जमिनीचे गटनंबर असतात त्या प्रत्येक गटासाठी एकच सातबारा असतो.

 मालकाशिवाय दुसऱ्या व्यक्तीचे नाव, कुळ, खंड इत्यादींची नावे सातबारा उतारामधील लावण्याचा अधिकार तलाठी यांना नाही.

सातबारा उतारा असलेल्या नोंदींचे पुस्तके दर दहा वर्षांनी लिहिली जातात.

   गाव नमुना 12 हा पिकांसंबंधी आहे. गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदी घेताना हंगाम व पिकांच्या नोंद घेणे अभिप्रेत असते. गाव नमुना नंबर असलेल्या रकान्यात पिकांच्या नोंदी लिहाव्यात व त्या खालील क्षेत्र  लिहावे.

पिकपाहणी संदर्भातील महत्त्वाच्या बाबी

 पिक पाहणीच्या रकान्यात वहिवाट दाराचे नाव आहे की नाही हे तपासावे.

पिक कोणते आहे व किती क्षेत्रात आहे याची नोंद केली की नाही हे कटाक्षाने पाहावे.

विहीर व इतर सिंचनाच्या साधनांची नोंद पहावी.

गाव नमुना 12 मध्ये पडीक जमिनी, त्यांचे प्रकार यांच्या नोंदी असतात.

आपल्यापैकी बऱ्याच जणांना 7 -12 या अंकांचा व्यवस्थित अर्थ माहीत नसतो. वरती दर्शविल्याप्रमाणे या दोन अंकांचा अर्थ असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here