सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा जोमाने वाढ

16,584 views

मागील आठवड्यात बाजारात सोयाबीन ला बाजारभाव चांगल्या प्रकारे मिळाला आहे. यावेळी खरीप हंगामात पेरणी ला उशीर झाला झाल्याने बाजारात सोयाबीन ची आवक कमी झाली आणि त्यामुळे आवक कमी आणि दर जास्त मिळाले. सोयापेंड चा जो परिणाम बाजारावर होणार होता यो परिणामी कमी च प्रमाणात झालेला आहे. मागील आठवड्यात बाजारामध्ये सोयाबीन च्या दरात ५०० ते ७०० रुपयाने दर वाढ झाली असल्याने सध्याचे सोयाबीन पिकाचे बाजारात दर १०५०० रुपये वर पोहचलेला आहे.

केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात सोयापेंड आयात करण्यासाठी परवानगी दिलेली होती त्यानंतर सोयाबीन ची बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली होती.  परंतु बाजारात सोयाबीन च्या आवक चा तुटवडा आणि खरीप हंगामात लांबलेल्या पेरण्यांमुळे बाजारात पुन्हा एकदा सोयाबीन च्या भावाने आसमान गाठले आहे. दरवर्षी  बाजारात  सोयाबीन  १ ऑक्टोबर रोजी दाखल होते मात्र यावर्षी पेरण्या लांबल्या असल्याने किमान १५ दिवस तरी अजून बाजारात सोयाबीन दाखल होण्यास लागतील अशी माहिती शेतकऱ्यांनी दिलेली आहे.

देशातील बाजारपेठेत सध्या मोठ्या प्रमाणात सोयाबीन चा तुडवडा आहे. प्रत्येक वर्षी बाजारात जवळपास २ ते ३ लाख टन सोयाबीन चा साठा शिल्लक असतो मात्र यावेळी थोड्या प्रमाणात सोयाबीन शिल्लक असल्याचे बाजारातील लोकांनी सांगितले आहे. त्यामुळे किती स्टॉक शिल्लक ते पाहूनच सध्या सोयाबीन ची विक्री चालू आहे.ज्या ज्या ठिकाणी सोयाबीन प्रक्रियादार प्लँटस आहेत त्या ठिकाणी सध्या मागणी सुरु झाली आहे. मध्य प्रदेश मध्ये सोयाबीन ची आवक सुरू झाली असल्याचे माहिती मिळालेली आहे. पुढच्या आठवड्यात नवीन सोयाबीन बाजारात येईल अशी शक्यता इंदोर मधील व्यापारी वर्गाने दिलेली आहे जागतिक बाजारपेठेत गेल्या आठवड्यात सोयाबीन च्या भावात कधी चढ तर कधी उतार असे वातावरण निर्माण झाले होते. बाजारात सट्टेबाजांमुळे एक वेगळाच उत्साह निर्माण झालेला होता आणि त्याचमुळे देशातील बाजारामध्ये सोयाबीन च्या दरात ५०० ते ७०० रुपये ने वाढ झालेली आहे.

यामुळे दर तेजीतच राहण्याची शक्यता:

१. केंद्राने जी बाजारात सोयापेंड साठी आवक ची परवानगी दिली होती ती लगेच येण्याची शक्यता नाही.

२. देशातील बाजारात यावेळी १५ दिवस हंगाम उशिरा सुरू होणार आहे.

३. देशात काही प्रमाणात सोयाबीन उपलब्ध आहे.

४. सोयाबीन चे जे प्रक्रिया प्लांटस आहेत तिथे मागणी सुरू आहे.

५. सट्टेबाजांमुळे सोयाबीन च्या दरात तेजाने वाढ सुरू.

पुन्हा गाठली दहा हजारी:

ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने सोयापेंड ला आयात करण्यासाठी परवानगी दिली आहे आणि याच परिणाम सोयाबीन वर झाला असून बाजारात सोयाबीन चा भाव ८ हजार रुपयांवर गेला. मागील आठवड्यात सोयाबीन च्या दरात ५०० ते ७०० रुपये ने वाढ झाली तर राजस्थान मधील बाजारात १०५०० रुपये ने भाव सुरू आहे.काही सोयाबीन प्रक्रिया प्लांटस मध्ये सोयाबीन दरात ८०० ते १५०० ने वाढ झाली. गेल्या आठवड्यात मध्यप्रदेश मध्ये सोयाबीन चा भाव ९२०० ते ९७०० रुपये होता. महाराष्ट्र राज्यात ९००० ते ९५०० रुपये भाव मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here