शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा; राज्यात ‘या’ दिवशी मुसळधार पाऊस

7,776 views

गेल्या आठवड्याभरापासून राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. मात्र येत्या २ दिवसांत तापमानात किंचित वाढ अपेक्षित असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. नंतर 25 ते 27 जानेवारी दरम्यान पुन्हा उत्तर महाराष्ट्र पट्टयामध्ये तापमान खाली जाण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. यामुळे मुंबई, ठाण्यासह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये थंडी जाणवण्याची शक्यता आहे.

कोरड्या हवामानामुळे राज्यात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळालं. यामुळे किमान तापमानातही घट झाली आहे. अशात उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये वातावरणात वेगाने बदल होताना दिसत आहे. देशात अनेक राज्यांमध्ये तर अद्यापही पाऊस सुरू आहे. राज्यातही फेब्रुवारी महिन्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.

भारतीय हवामान खात्याने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, चार आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार 5 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे. यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याध्ये तुरळक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे शेतीला धोका पोहोचण्याची अधिक शक्यता आहे.

स्त्रोत- कृषिनामा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here