नवीन कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनच्या प्रतिनिधींमध्ये आज झालेल्या चर्चेत 4 पैकी 2 मुद्द्यांवर दोन्ही बाजूंची सहमती झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना काल ही माहिती दिली.
आजची चर्चा अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात झाली असून उर्वरित दोन मुद्द्यांवर चर्चेसाठी पुढच्या महिन्याची 4 तारीख निश्चित केली असल्याचं तोमर यांनी सांगितलं. शेतकऱ्यांसाठी वीज वितारणासंदर्भातला कायदा आणि पर्यावरणासंबंधीचा कायदा या दोन मुद्द्यांवर आज चर्चा झाल्याचं तोमर म्हणाले.
विज्ञान भवनात बुधवारी शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याशी दीर्घ चर्चा केली. कायदे तयार करणे आणि रद्द करणे ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे मागण्यांसदर्भात एक समिती तयार करण्याची सरकारने तयारी दर्शविली.
याशिवाय वीज अधिनियम सुधारणा कायदा रद्द करण्याबाबत सरकारकडून आश्वासन देण्यात आले. दिल्ली व परिसर प्रदूषण नियंत्रण कायद्यातील दंडात्मक तरतुदी मागे घेण्याबाबतही मंत्र्यानी आश्वासन दिले.