“बिहारच्या रोहित सिंह यांची कलिंगड शेती – एका हंगामाची कमाई ४० लाख रुपयांपेक्षा अधिक”

4,171 views

सैनिकशाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी नेहमीच देशासाठी लढण्यासाठी तयार असतात परंतु बिहारच्या हाजीपूर येथे राहणाऱ्या रोहित यांनी देशासाठी असणारे प्रेम शेतीमधून दाखविले आहे.
सैनिक शाळेत शिक्षण घेऊन देखील शेतीमध्ये स्वतःचा जम त्यांनी बसवला आहे.
२५ वर्ष वय असणाऱ्या रोहित यांनी १५० एकरवरती शेती करून २०० लोकांना रोजगार मिळवून दिला आहे.


रोहित यांनी आधुनिक पद्धतीने कलिंगडाची शेती करून कृषी क्षेत्रात नवीन बदल घडवून आणला आहे. एका हंगामात त्यांची १०० ट्रकपेक्षा अधिक कलिंगडाची विक्री होते आणि कमाई ४० लाख रुपयांपेक्षा अधिक असते. रोहित शेतात ८-१० तास काम करतात. कलिंगडाव्यतिरिक्त रोहित खरबूज, काकडी व केळ्याची देखील लागवड करत आहेत. पाणी देण्यासाठी ते ठिबक सिंचनाचा वापर करतात. ठिबक सिंचन असल्यास पाणी व खताची देखील बचत होते. कृषी विभागाकडून रोहित यांना सबसिडी देखील मिळाली आहे. रोहित नेहमी पिकवलेल्या पिकांच्या मार्केटिंगवर लक्ष्य देतात. त्यांच्या फळांची मार्केटिंग बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि बांगलादेश या ठिकाणी देखील होते. रोहित यांचे वडील देखील शेती करायचे परंतु परंपरागत शेती केल्याने शेतीमधून जास्त उत्त्पन्न निघत नव्हते परंतु रोहित यांनी वैज्ञानिक व आधुनिक पद्धतीने शेती करून हे सिद्ध केले की शेतीमधून देखील जास्त उत्पन्न निघू शकते.
रोहित एवढ्यावरच थांबले नाहीत.
२.५ – ३ हजार युवकांना आधुनिक शेतीसाठी प्रेरित केले आहे. रोहित शेती करण्याबरोबरच शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी ऍग्री क्लीनिक देखील सुरु केले आहे.
आज देशाला रोहित सारख्या युवकांची गरज आहे की जे शेतीला एका उंच पातळीवर घेऊन जातील.

Respect

ऍग्रीवाला #agriwala #FNV #farmfresh #residuefree #TheHealthyFood #AgriwalaFarmersClub #organic

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here