बारावीत दोनदा नापास झालेला वैभव नवले PSI च्या परीक्षेत राज्यात पहिला

बारावीच्या परिक्षेत दोनदा नापास तर राज्य लोकसेवा आयोगाच्या दुसऱ्याच परिक्षेच्या प्रयत्नात बाजी मारत करमाळ्याच्या वैभव अशोक नवलेने महाराष्ट्र पहिला येत पोलिस उपनिरिक्षक पदावर विराजमान होण्याची संधी मिळवली आहे. विशेष म्हणजे वैभव मागील परिक्षेत पहिलाच प्रयत्न असतानाही अवघ्या एका मार्काने अपयशी ठरला होता तर तालुक्यातुन आठ जण परिक्षा उत्तीर्ण झाले होते. पण यंदा मागील अपयश धुऊन लावत वैभवने परिवारासह तालुक्याचे नाव महाराष्ट्रात कमावले आहे.

वैभव नवले याचे वडील सामान्य कुटुंबातील त्यांनी करमाळा आगारात क्लार्क म्हणुन नौकरी केली आहे. सेवा निवृत्त झाल्यानंतर मुळचे कंदरचे पण करमाळ्यात स्थाईक झाले आहेत. वैभव ने आपले शिक्षणाला सुरुवात करमाळा येथील नगरपरिषद मराठी शाळा क्रमांक तीन मधुन सुरुवात केली. त्यानंतर महात्मा गांधी विद्यालयातुन शिक्षण घेत असताना आकरावी व बारावीला विज्ञान विभागात प्रवेश मिळवला. आभ्यासात जेमतेम असल्याने २००९ व २०१० ला सलग दोन वर्षी बारावीची परिक्षा अनुउत्तीर्ण झाला. दोन्ही वर्षी चार चार विषय गेले पण न खचता वैभवने यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात कला शाखेतुन प्रवेश मिळवला व आपले पदवीचे शिक्षण पुर्ण केले. मागील वर्षी पोलिस उपनिरिक्षक पदी विराजमान झालेल्या कृनाल घोलप यासह इतर मित्रांच्या संगतीत वैभव पुढील परिक्षांच्या तयारीसाठी २०१६ ला पुणे येथे गेला. अनुभव घेण्यासाठी काही शीबीरेही त्याने घेतली. कधी शिकवणी किंवा वेगळे शिक्षण न घेता मित्रांच्या अनुभव व आभ्यासावर आभ्यास करीत राहिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here