फिप्रोनील ५ एस सी- खोडकिड व थ्रिप्सच्या व्यवस्थापनासाठी रामबाण उपाय

3,372 views

व्यापारी नाव- रिजेन्ट (Regent)

पिके(कंसात हेक्टरी प्रमाण)

 • भात- खोडकिड, तपकिरी तुडतुडे, हिरवे तुडतुडे ( १००० मिली ५००लिटर पाण्यात)
  कोबी- पृष्ठवंशीय पतंगा म्हणजेच डायमंड बॅक मॉथ ( ८०० ते १००० मिली ५०० लिटर
  पाण्यात)
 • मिरची- फुलकिडे, मावा, फळ पोखरणारी अळी ( ८०० ते १००० मिली ५०० लिटर
  पाण्यात)
 • ऊस- खोडकिडा ( १५००ते २००० मिली ५०० लिटर पाण्यात)
 • कापूस- बोंडअळी, मावा, तुडतुडे, पांढरी माशी ( १५०० ते २००० मिली ५०० लिटर
  पाण्यात)

फिप्रोनील हे एक फिनील पायराझोल गटातील कीटकनाशक असून याचा उपयोग विविध किडीच्या नियंत्रणासाठी होतो. याची काम करण्याची पद्धत नवीन, असल्यामुळे त्याचा उपयोग कीटकनाशक प्रतिकार व्यवस्थापनामध्ये करण्यात होतो. हे कीटकनाशक कीटकांच्या पोटात गेल्यावर काम करते ( stomach poison ) ते किटकात क्लोराईड आयन च्या वहनांमध्ये बाधा आणते. त्यामुळे मध्यवर्ती चेतासंस्था बाधित होते व कीटक मरून जातो.

हे कीटकनाशक हळूहळू काम करते पण याचे परिणाम दीर्घकाळ दिसतात, त्यासोबत काही पिकात याच्या वापराने पिकाची वाढ चांगल्या प्रकारे झालेली आढळून आली आहे यालाच पीक वाढ संवर्धक (Plant Growth Enhancer)असे म्हणतात. उपलब्ध कीटकनाशकापैकी चांगले फुलकिडीनाशक आहे. याचा उपयोग आपण विविध कीटकनाशके, बुरशीनाशके यांच्या सोबत करु शकतो. मधमाश्यांची संख्या जास्त असणाऱ्या शेतात याचा वापर शक्यतो टाळावा.

शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी कीटकनाशकाची खरेदी करताना योग्य ते घटक तपासूनच खरेदी करावी. तसेच कीटकनाशकाचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावा .

 • डॉ. अंकुश जालिंदर चोरमुले
 • कीटकशास्त्रज्ञ, प्रबंधक होय आम्ही शेतकरी समूह, महाराष्ट्र राज्य
 • संपर्क- ८२७५३९१७३१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here