फळमाशीच्या नियंत्रणासाठी घरच्या घरी तयार करा कामगंध सापळे


सध्या पावसाळी वातावरणामुळे डाळिंब, संत्री, टोमॅटो, आणि वेलवर्गीय पिकामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होत आहे.. याच्या नियंत्रणासाठी शेतकरी विविध किटकनाशक वापरतात परंतु त्याचे अपेक्षित परिणाम अजिबात दिसत नाहीत. फळमाशीच्या खात्रीशीर नियंत्रणासाठी कामगंध सापळे हा उत्तम पर्याय आहे.. यामुळे फळमाशिपासून खात्रीशीर नियंत्रण मिळवता येते शिवाय ही पद्धत पर्यावरण पूरक आहे.. शेतात उपलब्ध असणाऱ्या सर्व मित्रकिडीना ही पद्धत हानिकारक नाही. कामगंध सापळे वापरल्यामुळे कीटकनाशकांचा वापार देखील करण्याची गरज भासत नाही.. बाजारात सध्या तयार कामगंध सापळे मिळतात परंतु ते महाग आहेत..
शेतकरी बंधू घरच्या घरी हे कामगंध सापळे कसे बनवू शकतात याची माहिती आज आपण घेणार आहोत. अगदी 10 ते 20 रुपयात हा सापळा आपण घरच्या घरी बनवू शकता.. हा सापळा कसा बनवावा याची एक Pdf फाइल या msg बरोबर शेयर करत आहे. राष्ट्रीय वनस्पती स्वस्थ प्रबंधन संस्थान(NIPHM) यांचेकडून या कमी खर्चात तयार होणाऱ्या या कामगंध सापळ्यांचा शोध लावण्यात आला आहे. सदर pdf काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या स्टेप वापरून कमी खर्चात फळ माशीसाठी कामगंध सापळा घरच्या घरी तयार करा..
PDf डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा

https://drive.google.com/file/d/0B_vYhquoBvy2cHlUZ0NzM3hCa28/view?usp=drivesdk

अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ. अंकुश जालिंदर चोरमुले
कृषि किटकशास्त्रज्ञ व प्रबंधक होय आम्ही शेतकरी समूह, महाराष्ट्र राज्य
8275391731

​​​​​​​​​​||अन्नदाता सुखी भवः ||​​​​​​​​​​​​​​​​​​​​

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here