अगदी बरोबर तुमच्याकडे पैसा नसला तरी तुम्ही शेत जमिनीचे मालक होऊ शकता. अल्पभूधारक शेतकरी किंवा ज्यांना शेत घ्यायचे आहे त्यांच्यासाठी ही खूप भन्नाट योजना आहे. ही योजना एसबीआय बँकेची. जर तुम्ही लहान आणि अल्पभूधारक शेतकरी आहात आणि तुम्हाला शेती विकत घ्यायची असेल. तर भारतातील सर्वात मोठया स्टेट बँक इंडियाने शेतकऱ्यांसाठी जमीन खरेदी योजना आणली आहे.
या योजनेचा उद्देश काय –
एसबीआय (लँड परचेस स्कीमचा) जमीन खरेदी योजनेचा उद्देश हा आहे की, छोट्या शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यास मदत करणे. किंवा ज्यांच्याकडे शेती करण्यायोग्य जमीन नाही अशा शेतकऱ्यांना जमीन घेण्यासाठी मदत केली जाते. या योजनेचा लाभ घेताना किंवा या योजनेतून कर्ज घेण्यासाठी एक अट आहे. अर्जदारावर कोणत्या दुसऱ्या बँकेचे कर्ज नसावे.
जाणून घ्या योजनेची वैशिष्टये
खालील गोष्टींसाठी कर्ज दिले जाईल.
१ ) जमीन खरेदी
२) जमीन विकास, सिंचन विकास ( जमिनीच्या एकूण किमतीच्या ५०% पेक्षा जास्त नसावी)
३ ) शेती अवजारे खरेदी
४ ) जमीन नोंदणी फी
५ ) कर्जाच्या रकमेच्या ८५% पर्यंत कर्ज मिळेल.
६ ) गहाण असलेली जमीन घेण्यासाठी
पात्र शेतकरी :
१ ) लहान आणि अल्पभूधारक शेतकरी ज्याकडे ५ एकरपेक्षा कमी कोरडवाहू शेती आणि २.५ एकरपेक्षा कमी सिंचित जमीन.
२ ) कर्ज घेणाऱ्या व्यक्तीने मागच्या दोन वर्षांपासून नियमित कर्जाची परतफेड केली असावी.
३ ) इतर बँकेत खाते असणारे लोक या योजनेचा फायदा घेऊ शकतात परंतु त्यांना इतर बँकेत असलेलं कर्ज बंद करावी लागतील