पिकांच्या उत्पादन वाढवण्यासाठी कोणते घटक आहेत आवश्यक

3,022 views

शेतकरी बांधवांनो आपण उत्पन्न वाढीसाठी विविध उपाय करत असतो. यात सर्वाधिक केला जाणारा उपाय म्हणजे रासायनिक खतांचा वापर.  आपण जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता टिकवून उत्पन्नात चांगली वाढ व्हावी. यासाठी विविध खतांचा उपयोग करत असतो. परंतु खरंच या रासायनिक खतांचा पीक वाढीसाठी आणि  उत्पन्न वाढीसाठी फायदा होता का? जर होतो तर तो कितपत फायदा होतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न या लेखातून करण्यात आला आहे. घेऊया.आपण जर रासायनिक खतांचा विचार केला तर तर आपण पुढीलपैकी खतांचा पुरवठा करीत असतो.

1-10:26:26-NPK

2-DAP-NP

3-12:32:16-NPK

4-0:52:34-pk

5- युरिया

वर उल्लेख केलेल्या रासायनिक खतांचा वापर आपण जास्तीत जास्त प्रमाणात पिकांना करीत असतो. परंतु या खतांचा आपण विचार केला तर यामध्ये फक्त तीन प्रकारचे अन्नद्रव्य देत असतो. मात्र पिकांना चांगल्या वाढीसाठी आणि पोषणासाठी १६ प्रकारची अन्नद्रव्ये घटक लागतात. त्याची माहिती अगोदर करून घेऊ.

 • हवेतून मिळतात तीन घटक- H. O
 • मुख्य अन्न घटक तीन-NPK
 • दुय्यम अन्नघटक तीन-ca, mg, s
 • सूक्ष्म अन्नघटक 7-fe, zn, b, cl, cu, mo, mn

हे सगळे प्रकारचे घटक पिकांच्या चांगल्या वाढीसाठी आवश्यक असतात. तेच घटक आपण नुसते देत नसल्याने येणारे उत्पन्न कमी होते. तसेच मातीची सुपीकता ही तेवढीच महत्वाची असते. मातीच्या सुपीकतेसाठी लागणारे आवश्यक घटक खालीलप्रमाणे.

 • जिवाणू
 • गांडूळ
 • सोळा प्रकारच्या अन्नघटक
 • पाणी
 • हवा
 • सेंद्रिय कर्ब
 • जमिनीचा सामू अर्थात पीएच

 परंतु सद्यस्थितीचा विचार केला तर आपण फक्त मातीला तीन मुख्य घटक देत असतो. याचा परिणाम असा होतो की, जमिनीतील जिवाणू, गांडूळ संपल्यामुळे जमिनीत हवा जात नाही, पाणी व्यवस्थित मुरत नाही त्याचा परिणाम जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होण्यावर होतो. मातीची सुपीकता कमी होऊन उत्पन्न घटते. जर मातीची सुपीकता व उत्पन्न वाढवायचे असेल तर सेंद्रिय औषध वापरावे लागतील. कारण सेंद्रिय औषधे किंवा खते मातीला मनुष्याला आणि पिकांना आणि मातीला हानीकारक नाहीत. यामध्ये असलेले घटक जमीन आणि माती सुपीक करण्याचा मदत करते तुमची पीक जोमाने वाढेल. त्यामुळे सर्व घटकांचा चौफेर वापर करून उत्पन्न वाढीला चालना द्यावी.

स्त्रोत- कृषिजागरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here