पालाश म्हणजेच पोटँशविषयी थोडक्यात माहिती

पोटँश /पालाश
पोटॅशयुक्त खते :ही वनस्पतींना आवश्यक असणारी खते होत. यांतील पोटॅशियमाचे प्रमाण नेहमी पोटॅशियम ऑक्साइडामध्ये (K2O) व्यक्त केले जाते. पोटॅशयुक्त खते ही वाढणाऱ्या वनस्पतींना आवश्यक असून ऊतकांच्या चयापचयासाठीही (शरीरात सतत होणाऱ्या रासायनिक-भौतिक घडामोडींसाठीही) आवश्यक असतात. स्टार्च व शर्करा तयार करण्यासाठी आणि त्यांच्या वहनासाठी, धान्ये व गवत यांची खोडे बळकट होण्यासाठी, खराब हवेपासून वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी, जमिनीतील नायट्रोजनाचे प्रमाण व्यवस्थित राखण्यासाठी इ. कारणांसाठीही या खतांचा उपयोग होतो.

पोटॅशियम लवणांपैकी क्लोराइड, सल्फेट व नायट्रेट ही लवणे खत म्हणून वापरली जातात. ती पाण्यात विद्राव्य असून त्यांचे वनस्पती शोषून घेऊ शकतील अशा पोटॅशियम आयनांत अपघटन होते. पृथ्वीवर पोटॅशियम हे विविध खनिजांचा भाग म्हणून सर्वत्र आढळते. बहुतेक सर्व पोटॅश खते ही सिल्व्हाइट, कार्नालाइट, कायनाइट, लँगबेनाइट, सिल्व्हॅनाइट या जलविद्राव्य खनिजांपासून आणि काही प्रमाणात लवणद्रवांपासून तयार करतात.

पोटॅशियम क्लोराइड: हे म्युराइट ऑफ पोटॅश या नावाने विकले जाते. नेहमीचे ९८% शुद्ध पोटॅशियम क्लोराइड खत व्यवसायात ६०% म्युराइट म्हणून ओळखले जाते, तर अशुद्ध पोटॅशियम क्लोराइडला ५०% म्युराइट म्हणतात.

हे मिठासारखे दिसणारे व कडू चव नसलेले खत आहे. त्यातून ६०% पोटॅश मिळते. खनिजांपासून ते स्फटिकीकरणाने व प्लवनाने (तरंगवून) तयार करतात. ते चूर्ण स्वरूपात तसेच दाणेदार स्वरूपात तयार करतात. ते जलविद्राव्य असून जास्त प्रमाणात वापरात असणारे पोटॅशयुक्त खत आहे.

पोटॅशियम सल्फेट : या खतात ४८–५०% पोटॅश असते. हे खत पोटॅशियम क्लोराइड व सल्फ्यूरिक अम्ल यांच्या विक्रियेने, तसेच लँगबेनाइट या खनिजापासून तयार करतात. हे खत जलविद्राव्य असले, तरी ते वाहून जात नाही.

पोटॅशियम नायट्रेट : नायट्रिक अम्ल व पोटॅशियम क्लोराइड यांच्या विक्रियेने हे खत तयार करतात. हे कमी जलशोषक असल्याने त्याचा खत म्हणून वापर करतात. यात ४४% पोटॅश व १३% नायट्रोजन असतो.

इतर पोटॅशयुक्त खते : पोटॅशियम–मॅग्नेशियम सल्फेट (२५–३०% पोटॅश) हे लँगबेनाइटापासून तयार करतात. सिमेंट निर्मितीच्या भट्ट्यांतील वाया जाणारी धूळ, साखर व्यवसायात निर्माण होणारी मळी, राख, लोकर धुतल्यावर निघणारा मळ यांपासूनही पोटॅश मिळवितात.

पोटॅशियम विषयी थोडेसे…
पोटॅशयुक्त खते अनेक आहेत. पण खालील २ प्रकारची पोटॅशयुक्त खते आपल्याकडे प्रामुख्याने वापरली जातात:
१) क्लोराईड्स:

  • या गटात ढोबळमानाने आपल्याकडे एकच प्रकारचे खत आहे, ते म्हणजे MoP. यामध्ये ५०% पोटॅशियम असते.
    २) सल्फेट:
  • या गटात SoP व पोटॅशियम नायट्रेट ही खते प्रामुख्याने वापरली जातात. SoP मध्ये ४३% तर पोटॅशियम नायट्रेट मध्ये ३७% पोटॅशियम असते.
    द्राक्ष, फळझाडे, ऊस, बटाटा, टोमॅटो, काकडी, कांदा, कपाशी या पिकांमध्ये क्लोराईड युक्त खते वापरु नयेत. याचे कारण म्हणजे या पिकांना क्लोरीन थोडेसुद्धा जास्त झाले तर चालत नाही. म्हणून सदर पिकांमध्ये पोटॅशियम द्यायचे असल्यास सल्फेट/फॉस्फेट गटातील खतांतून द्यावे, म्हणजे आपल्या खतांना चांगला रिझल्ट येईल आणि झाडांना होणारा त्रास व त्यातून होणारा विनाकारण खर्च वाचेल.

पालाश ( पोटॅश )

पालाशचे कार्य
• पालाशमुळे पिकांची वाढ जोमाने होऊन त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते .
• तृणधान्य पिकामध्ये मजबुतपणा येतो . त्यामुळे हि पिके जमिनीवर लोळत नाहीत .
• वनस्पतीच्या पेशीतील पाण्याचे नियमन होते .
• वनस्पतीचा वासोच्छवास आणि पर्ण बाधिभवन याद्वारे वनस्पतींच्या शरीरातील पाण्याचे नियमन योग्य प्रकारे होते . त्यामुळे पाण्याचा योग्य उपयोग होऊन पाण्याच्या कमतरते मुळे पिके वाळण्याचे प्रमाण कमी होते .
• पिष्ठमय पदार्थ आणि शर्करा तयार करण्यासाठी पालाश महत्वाचे कार्य करते , म्हणून बटाटे , रताळी , केळी , सुरण आणि साबुदाना या पिकाकरीता जास्त गरज असते . वनस्पतीमधील प्रथिने आणि हरितद्रव्य तयार होण्याच्या प्रक्रियेत मदत होते .
• पोटॅशियममुळे संप्रेरकांच्या क्रियेमध्ये वाढ होते . • नत्राचे प्रमाण अधिक असल्यास त्यामुळे होणारे दुष्परीणाम पोटॅशियमच्या पुरक कमी होतात . म्हणून पिक पोषणास नत्र आणि पालाशचे योग्य प्रमाण असणे आवश्यक
• पोटॅशीयममुळे तंबाखुची पाने आणि कापसाच्या धाग्यांची गुणवत्ता वाढते .
• फळपिकामध्ये फळांचा आकार वाढून , चव आणि साठवण क्षमता वाढते .

पालाशच्या कमतरतेची लक्षणे

• कमतरतेची लक्षणे सर्वसाधारणपणे पिकांच्या जुन्या पानांवर प्रथम दिसून येतात .
• पिकांची पाने पिवळी पडून , पानांच्या कडा वेड्यावाकड्या व तपकिरी होतात .
• पिकांचे खोड अशक्त बनून पिके जमिनीवर लोळतात . . पिकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते . पिकांची उत्पादन शक्ती कमी होते .
• मुळांची वाढ योग्य प्रमाणात होत नाही त्यामुळे पिकांची वाढ सावकाश होते . . फळ पिकांतील फळे लहान आणि सुरकुत्या पडल्यासारखे दिसतात . . पिकाचे खोड अशक्त बनते , पिक रोगास सहजासहजी बळी पडते .
• फळांचा आकार वेडावाकडा होऊन त्यावर सुरकुत्या पडल्यासारखे दिसते .

उपाय

शिफारसीनुसार पिकानुरूप जमिनीव्दारे खत मात्रा द्यावी .
पिकावर वाढीच्या संवेदनशील अवस्थेत १ % पोटॅशियम नायट्रेट / सल्फेटची फवारणी करावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here