दोन डोळ्याची कांडी लावण पद्धत भाग -१ :– सुरेश कबाडे

2,006 views

ज्या शेतकऱ्यांना एक डोळा लावण करण्याचे अनुभव आहे किंवा ज्यांना काळजी पूर्वक लावण करायला जमते त्यांनीच एक डोळा लावण करावे.कारण एक डोळा लावण करत असताना प्रत्येक कांडीला एकच डोळा असल्यामुळे तो डोळा जर उगवून नाही आला तर त्या ठिकाणी तुटाळ होते.

दोन डोळ्याच्या कांडीला एक डोळा खराब असेल तर दुसरा डोळा चांगला असतो. दोन डोळ्याच्या कांडीचे दोन्ही डोळे सहसा खराब नसतात.एक डोळा लावणीच्या तुलनेत प्रत्येक डोळ्याला एक एक्स्ट्रा डोळ्याचे ऑप्शन असते.

एक डोळा लावण करत असताना प्रत्येक डोळा चेक करावा लागतो. समजा तुम्ही 2फूट या अंतरावरती एक डोळा लावण केलेली असेल, व त्यातील एक डोळा नाही उगवला तर त्या ठिकाणी दोन रोपांतील अंतर 4फूट पडते.

त्यामुळे ज्यांना अतिशय काळजीपूर्वक एक डोळा लावण करायला जमते त्यांनी एक डोळा लावण करावे .ज्यांना हे सर्व करणे अशक्य वाटते त्यांनी दोन डोळ्याची कांडी लावण करावी.
क्रमशः

श्री. सुरेश कबाडे.
प्रबंधक, होय आम्ही शेतकरी समूह,
रा.कारंदवाडी ता:-वाळवा जि:-सांगली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here