देशात एकीकडे केंद्र सरकारच्या कृषी विधेयकावरून आंदोलन सुरू असून, दुसरीकडे मोदी सरकारने उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने 60 लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून होणारे उत्पन्न, तसेच सब्सिडीचा 5 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
यावर्षी सरकारने 60 लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला असून, त्यावर सरकार शेतकऱ्यांना सब्सिडी देणार आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे. या निर्णयामुळे देशातील 5 कोटी शेतकऱ्यांना, तसेच 5 लाख कामगारांना याचा लाभ मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या आठवड्यात देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 5000 कोटी रुपये सब्सिडी मिळणार आहे. 60 लाख टन साखरेला 6 हजार प्रति टनानुसार निर्यात केले जाणार आहे.