काल बारामती तालुक्यात बऱ्याच उसाच्या प्लॉट ला भेटी दिल्या. गन्ना मास्टर वापरलेल्या प्लॉट ची पाहणी करण्याचे काम होते. त्या दरम्यान कोऱ्हाळे ते कांबळेश्वर या प्रवासात होळ च्या नजदीक आल्यावर अचानक मातीवर ध्यान गेले.. या भागातील शेकडो एकर जमिनींना मीठ फुटले आहे. क्षारांचे थर जमिनीवर दिसत असून काही जमिनी तर मिठागरे आहेत का काय असा भास होत होता. या भागातील माती एकदम पांढरीखड झाली आहे.
अश्या जमिनी खराब होण्याचे प्रमुख कारण म्हणजे पाण्याचा अति वापर, खतांचा बेसुमार वापर. मी वरती नमूद केलेला भाग हा नीरा नदी काठाला आहे. पाण्याची उपलब्धता खूप आहे. जमिनीही काळ्या खोल आहेत त्यामुळं पाण्याचा निचरा या जमिनीतून होत नाही. या भागात वर्षानुवर्षे उसाचे पीक घेतले जाते. 265 ही मेजर जात या भागात लावली जाते.
शेतकऱ्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. हीच परिस्थिती आपल्यावर ही येऊ शकते. पाण्याचा आणि खतांचा वापर एकदम जपून आणि संयुक्तिक करा. जमीन काळी खोल असेल तर निचरा प्रणाली बसवून घ्या. जे पाणी शेतीसाठी वापरणार आहात त्या पाण्यात क्षारांचे प्रमाण योग्य असावे. जर पाणी क्षारयुक्त असेल तर शक्यतो सॉफ्टनर वापरा. अश्या प्रकारच्या जमिनीत क्लोराईड युक्त खतांचा वापर कमीत कमी करा.,
अश्या जमिनी परत लागवडियोग्य होऊ शकतात का?,
नक्कीच होऊ शकतात. यासाठी ड्रेनेज सिस्टीम खूप महत्वाची आहे. निचरा पाईप प्रणालीचा वापर करणे अनिवार्य आहे. सोबत सेंद्रिय घटक जमिनीत ऍड करणे अति महत्वाचे आहे.
डॉ अंकुश जालिंदर चोरमुले
कृषी कीटक शास्त्रज्ञ
गन्ना मास्टर ऍग्रो इंडस्ट्रीज प्रा. ली.
8275391731