गन्ना मास्टर- हळद किटचे एकत्रित कार्य, फायदे व उपलब्धता

गन्ना मास्टर टीमने आत्तापर्यंत शेतकरी मित्रांसाठी दर्जेदार उत्पादने आणली आहेत त्यामध्ये उसाचे कीट असेल कांदा किट किंवा भाजीपाल्याचे किट असेल. मागील हळदीच्या हंगामात आपण वर्षभर हळद किटच्या ट्रायल संपूर्ण महाराष्ट्रभर घेतल्या आणि त्याचे परिणाम हे सुंदर मिळाले. त्याच संशोधनाच्या आधारावर वर आपण पण हे कीट शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देत आहोत. त्या किटचे कार्य व फायदे काय आहेत तसेच त्याची उपलब्धता कशी होईल याबाबत सविस्तर माहिती खाली दिली आहे

हळद किटचे एकत्रित कार्य

👉🏻किटच्या वापरामुळे बियाण्याची उगवण क्षमता सुधारते.
👉🏻मुळ्या लवकर फुटतात व मुळ्यांची वाढ जोमदार होते.
👉🏻सतत बदलणारे वातावरण तापमानामधील चढ उतार क्षारांचे वाढलेले प्रमाण, कमी जास्त सामु, पाण्याचा ताण पाणी साठून राहणे. इ. विपरित परिस्थितीमध्ये पिकाची वेगाने व निरोगी वाढ होते.
👉🏻 जमिनीतील अन्नद्रव्ये पिकाला त्वरित उपलब्ध करून दिली जातात. अन्नद्रव्यांचे शोषण, वाहन आणि विनियोग वेगाने वाढतो.
👉🏻फवारणीमुळे पानाची लांबी व रुंदी वाढते ज्यामुळे प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढतो व झाडाची अन्न तयार करण्याची क्षमता वाढते. फुटव्यांच्या अवस्थेत किट च्या वापरामुळे जाड व सशक्त फुटवे येतात. फुटव्यांची वाढ जोमाने होते.
👉🏻किटच्या वापरामुळे हळदीचे पीक कीड रोगांप्रती प्रतिकारक्षण बनते
👉🏻आळवणीमुळे जमीन भुसभुशीत होते त्यामुळे हळद पोसण्यास मदत होते. हळकुंडाची लांबी वाढते सोबत जाडीही चांगली होते.
👉🏻निर्यातक्षम आणि विषमुक्त हळद उत्पादनासाठी एकदम उपयुक्त

गन्ना मास्टर हळद किटमध्ये एकूण 3 प्रकारचे प्रोडक्ट येतात त्याचा वापर एक एकर हळदीसाठी होतो
1.मास्टर लाईफ 1 किलो
2.मास्टर ग्रो 500 मि.लि.
3.मास्टर ग्रिप 500 मि.लि.

वरील प्रत्येक प्रोडक्ट चे नेमकं कार्य काय ते थोडक्यात पाहू

मास्टर लाईफ :
👉🏻जमिनीचे जैव, भौतिक व रासायनिक गुणधर्म सुधारून जमिनीची सुपीकता वाढवते.

👉🏻पांढऱ्या मुळ्या, फुटवे व पानांची जोरदार वाढ होते.

👉🏻जमिनीमध्ये पाणी व अन्नद्रव्ये धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

👉🏻जमिनीमधील सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढते. पाने व मुळ्यांची कार्यक्षमता वाढते.

👉🏻मुळ्यांना मिळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. जमिनीचा कस वाढतो व तो टिकून राहतो.

मास्टर ग्रिप : 500 मि लि

👉🏻डोळ्यांच्या सुरुवातीच्या वाढीस चालना मिळते.

👉🏻हळदीची रोपे जमिनित घट्ट पकड घेतात.

👉🏻मुळ्यांची संख्या व आयुष्यमान वाढते.

👉🏻हळदीला जोमदार व भरपूर फुटवे येतात.

👉🏻वापरलेल्या रासायनिक, सेंद्रिय व जैविक खतांची उपयुक्तता वाढते.

👉🏻अन्नद्रव्यांच्या शोषणास गती मिळून पिकाची वाढ वेगाने होते.

मास्टर ग्रो 500 मी लि

👉🏻फुटव्यांची जोमदार वाढ होते.

👉🏻कर्बग्रहण क्रिया वेगाने होते.

👉🏻अन्नद्रव्यांचे शोषण व विनियोग योग्य प्रकारे होते.

👉🏻कंदामध्ये अन्नघटक साठवण्याचे कार्य सुरू होते.

👉🏻कंद व झाड रोगप्रतिकारक बनते परिणामी बुरशीनाशक व कीटकनाशक या वरील खर्च कमी होतो.

👉🏻कंदांचे वजन वाढते. कंदाच्या गुणवत्तेमध्ये कमालीची सुधारणा होते.

👉🏻हळदीचे विक्रमी व दर्जेदार उत्पादन मिळवून अपेक्षित बाजार भाव मिळतो.

जर आपणास हळद किट विषयी अजून माहिती हवी असेल किंवा आपल्याला किट मागवायचे असेल तर खालील मोबाईल नंबर वर संपर्क करा.
श्री. शरद आवटी 9145019000
श्री. अमोल पाटील 7972967778

प्रत्येक प्रश्नाला एकच उत्तर… गन्ना मास्टर!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here