खोडकिडीच्या व्यवस्थापन करताना मला आलेला अनुभव- डॉ.अंकुश चोरमूले

20 जून 2020 रोजी मी उसाची रोप लागण केली. रोप लागण केल्यानंतर 7 ते 8 दिवसांनी खोडकीडचा प्रादुर्भाव दिसू लागला. सुरवातीला प्रादुर्भाव कुठंतरी दिसत होता म्हणून हमला या कीटकनाशकाचा स्प्रे घेतला. 2 ते 3 दिवसांनी पाहिले असता परत पोंगे जळत होते याचा अर्थ हमला चा काहीही फरक जाणवला नाही.

माझ्याकडे मागील वर्षी वाळवीसाठी आणलेले सिंजेटा कंपनीचे कॅपकॅडीस हे औषध शिल्लक होते म्हणून
ते वापरण्याचा निर्णय घेतला. उसावरील खोड किडीच्या व्यवस्थापनासाठी कॅपकॅडीस हे औषध लेबल क्लेममध्ये आहे. एकरी 100 ग्राम या प्रमाणात कॅपकॅडीस घेऊ ओलीवर आळवणी करून घेतली. आता मी काही प्रमाणात निर्धास्त होतो कारण थोडं हाय ग्रेड आणि नामांकित कंपनीचे औषध वापरलं होत. 2 ते 3 दिवसांनी परत शेतात जाऊन पाहिले असता परत पोंगे जळत असलेले दिसले. आतातरी नवीन आलेल्या फुटव्यावर देखील प्रादुर्भाव दिसत होता. या क्षेत्रातील जाणकार असल्यामुळे या गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला.

कंपनीच्या संशोधन आणि प्रोडक्ट ट्रायल घेणाऱ्या मुख्य अधिकाऱ्यांशी फोनवर बोललो. तेव्हा त्यांच्या बोलण्यातून आले की कॅपकॅडीस या कीटकनाशकाची इफीकसी खोडकिडी साठी लो आहे परंतु वाळवीसाठी हे कीटकनाशक चांगले काम करते. शेतात प्रादुर्भाव एकदम नगण्य किंवा नसताना जर याचा वापार केला तर परिणाम चांगले मिळतात असे त्यांच्या बोलण्यातून आले. टेक्निकल बाबतीत त्यांनीही योग्य माहिती दिली.

आता पुढे प्रश्न होता की करायचं काय? दरवर्षी वापरात असलेले कराटे तसेच रोगर हे कीटकनाशक वापरण्याचा निर्णय घेतला. कराटे या कीटकनाशकाचे परिणाम बोरर किडीसाठी चांगले आहेत हे माहीत होतेच. त्याच प्रमाणे रोगर हे कीटकनाशक मक्यावरील खोडकीड आणि खोडमाशी यासाठी खूप परिणामकारक आहे हे ही बऱ्याच ट्रायल नंतर मला जाणवले होते. दोन्ही कीटकनाशकांचे 1+ 2 मिली हे प्रमाण घेऊन काळजीपूर्वक उसाच्या पोंग्यात जाईल अशी फवारणी केली. यावेळीस मात्र खात्री होती की नियंत्रण नक्कीच भेटेल.

फवारणी केल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी पाहिले असता शेतात एकही कोंब मेलेला दिसला नाही. किडीचा प्रादुर्भाव जागच्या जागी थांबलेला दिसला. नवीन येणाऱ्या फुटव्यावर कुठेही प्रादुर्भाव नव्हता आणि निघणारे कोंब सशक्त होते. फक्त फवारणी करायच्या आधी सुकलेले सगळे पोंगे काढून घेतले होते. या फवारणी साठी एकरी अंदाजे 400 रुपये खर्च आला. कमी खर्चात एकदम चांगला परिणाम मिळाला. कॅपकॅडीस च्या आळवणी एकरी 800 ₹ खर्च आला.

वरील पोस्ट लिहिण्याचा उद्देश असा की कमी खर्चात किडीचे व्यवस्थापन करता येते. आजही शेतकरी किडीच्या व्यवस्थापनासाठी महागडी कीटकनाशके सुरवातीपासून वापरतात. आजतर कोणत्याही किडीच्या व्यवस्थापनासाठी कोराजन शिवाय बोलत नाहीत. उसातील खोडकिडीसाठी तर कोराजन वापरण्याची फॅशन आली आहे असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.

मित्रांनो शेतीचा उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर असेल तर असे कमी खर्चातील उपाय करणे गरजेचे आहे. त्याचे परिणाम देखील चांगले मिळतात. माझ्या ह्या प्रयोगातून खूप काही गोष्टी समोर आल्या. यात एकच कराटे रोगर हे उसाच्या खोडकीडीसाठी शिफारशीत नाही पण त्याचे रिझल्ट भन्नाट आहेत आणि बाकीच्या पिकात अश्या किडीसाठी शिफारशीत आहे.

खोडकिडीच्या व्यवस्थापनासाठी वरील कीटकनाशकांचा वापर करा एकदम बेस्ट रिझल्ट मिळतील.

डॉ. अंकुश जालिंदर चोरमुले
कृषी किटकशास्त्रज्ञ
8275391731

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here