खूप दिवसानंतर पोस्टाची जबरदस्त योजना, पती-पत्नीने खाते उघडल्यास मिळेल दुप्पट फायदा, जाणून घ्या !

कोरोनाव्हायरस च्या म हा मा री मुळे सध्या सर्व उद्योग धंदे ठप्प झाले होते. त्यामुळे येत्या काही काळात आर्थिक मंदीला सामना करावा लागणार अशी चिन्हे दिसत आहेत. सध्याच्या काळात नोकरीतून मिळालेल्या पैशांमुळे घर चालू शकत नाही कारण माणसांच्या गरजा वाढत चाललेल्या आहेत. अशातच महा मंदीमुळे सर्व काही महाग झाले आहे. त्यामुळे लोकसंख्या बचत करण्यासाठी नोकरी व्यतिरिक्त इतर साधने शोधत असतात.

आज आम्ही तुम्हाला या पोस्ट मधून पोस्ट ऑफिस च्या एका योजने बद्दल माहिती सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला अधिक नफा मिळू शकतो. पती-पत्नीला योजना दुप्पट फायदा मिळवून देऊ शकते. कारण या योजनेत पती-पत्नीला जॉईंट अकाउंट ओपन करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पोस्ट ऑफिस च्या या योजनेचे नाव मंथली इनकम स्की म असे आहे. या योजने मार्फत दर महिन्याला कमाई करण्याची संधी प्राप्त होईल.

काय आहे मंथली इनकम स्की म ?
एम आय एस ( मंथली इनकम स्की म) मध्ये वैयक्तिक किंवा संयुक्त अशा दोन्ही पद्धतीने पोस्टात खाती उघडता येतात. या योजनेत वैयक्तिक खाते उघडायचे असल्यास तुम्ही किमान १००० रुपये ते जास्तीत जास्त साडेचार लाख रुपये गुंतवू शकता. तर संयुक्त खात्यामध्ये जास्तीत जास्त नऊ लाख रुपये जमा केले जाऊ शकतात.

याशिवाय सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरेल. या योजनेमुळे तुम्हाला ६.६ टक्के वार्षिक व्याज मिळेल. या योजनेअंतर्गत तुमच्या एकूण ठेवीवरील वार्षिक व्याजानुसार परताव्याची मोजणी केली जाईल.

जर तुम्ही या योजनेत जॉइंट अकाउंट ओपन केले तर तुम्हाला या योजनेचा दुप्पट लाभ घेता येईल. म्हणजेच एखाद्या पती-पत्नीने या योजनेत जॉईंट अकाउंट ओपन करून त्यामध्ये ९ लाख रुपयांची गुंतवणूक केली ६.६ टक्के व्याजदराने ‌९ लाखाच्या जमा रकमेवर ५९४०० रुपयांचा वार्षिक रिटर्न त्यांना मिळू शकतो.

याचाच अर्थ त्यांना दरमहा ४९५० रुपये मिळतील. शिवाय या योजनेत तुमची मूळ रक्कम सुद्धा सुरक्षित राहील. तुम्हाला हवे असल्यास ५ वर्षानंतर आणखी ५ वर्षांचा गुंतवणुकीचा कालावधी वाढवू शकता.

या योजनेमार्फत पुढील फायदे होतील –
मंथली इनकम स्की म या योजनेतील चांगली गोष्ट म्हणजे या योजनेत दोन किंवा तीन लोक एकत्रपणे जॉइंट अकाउंट उघडू शकतात. त्यांच्या या जॉइंट अकाउंट बदल्यात त्या अकाउंट मधील प्रत्येक सदस्यास समान उत्पन्न दिले जाईल. शिवाय तुम्हाला नंतर कधी ते जॉइंट अकाउंट नको असल्यास त्या जॉइंट अकाउंटचे वैयक्तिक खात्यात रूपांतर केले जाऊ शकते.

तसेच वैयक्तिक खाते सुद्धा संयुक्त खात्यात रूपांतरित केले जाऊ शकते. खात्यात बदल करावयाचा झाल्यास सर्व खाते सदस्यांचा संयुक्त अर्ज द्यावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here