कोरडी ऊस लावण पद्धत:–

2,048 views

ऊसाची लावण करत असताना कोरडी लावण  करायचे असेल तर पहिल्यांदा मोकळ्या सरी मध्ये पाणी द्या.  नंतर 4दिवसांनी वापसा आल्यानंतर कुदळी च्या सहाय्याने चर काढून घ्या. एक एकर चर काढणे करीता एकरीं 4मजूर लागतात.

चर काढून घेतल्या नंतर त्या चरी मध्ये बेसल डोस टाकून घ्या. त्यासाठी एकरी 2बॅग डीएपी,1बॅग पोटॅश व  खोडकिडीच्या नियंत्रण साठी एकरीं 4किलो क्लोरेंट्रनिलीपरोले रासायनिक खतासोबत मिक्स करून घ्या. व चरी मध्ये खत टाकून मातीआड करून घ्या.

खत टाकल्या नंतर 1.5ते 2 फूट  अंतरावरती मार्किंग करून घ्या. व नंतर ज्या ठिकाणी मार्किंग ची खूण आलेली असेल त्या ठिकाणी एक डोळा कांडी वरती डोळे करून ठेवा. कांडी ठेवत असताना कांडी वरती पायाने चांगले प्रेस करा.पाणी दिलेले असल्यामुळे   कांडी मातीला चांगले प्रेस होईल. कांडी जितकी जमिनीमध्ये घट्ट चिटकून बसेल तितके ऊसाची उगवण चांगली होते. त्यानंतर  कांडी वरती  1.5इंच  माती झाकून घ्या.व लगेच पाणी द्या.

पाणी देत असताना जास्त मोठे पाणी सोडू नका. कारण  पाणी जास्त झाल्याने कांडी वरील माती वाहून जाऊन कांडी उघडी पडते. किंवा कांड्या पाण्याबरोबर वाहून जातात. पाणी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी  ज्या ज्या ठिकाणी कांड्या उघड्या पडलेल्या  दिसतील त्या  ओल्या मातीने झाकून घ्या.कोरडी लावण व्यवस्थित व काळजी पूर्वक केला तर कोरडी लावणीचे उगवण  अतिशय चांगली होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here