कापसावरील गुलाबी बोंडअळीला रोखण्यासाठी सीआयसीआरनं आणलं फेरोमेन लुअर्स

मागील दोन वर्षापासून कपाशी पिकावर बोंड आळीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात दिसून येत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. या गुलाबी बोंड आळीला अटकाव करण्यासाठी आणि तिचा वाढणारा प्रभाव थोपविण्यासाठी केंद्रीय कापूस संशोधन संस्था यांनी पुढाकार घेत सीआयसीआर फेरोमेन लुअर्स विकसित केले आहे. येत्या हंगामापासून जे राज्य कापूस उत्पादन करतात अशा राज्यांमध्ये प्रत्येकी एक हजार शेतकऱ्यांच्या शेतात याच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत.

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या तज्ञ दिलेल्या माहितीनुसार,  सन 2017 मध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यानंतर तो २०१८ मध्ये थोड्या प्रमाणात कमी झाला, परंतु 2019-20 हंगामात परत गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात दिसून आला नाही. परंतु तुलनेने 2020 ते 21 या वर्षीच्या हंगामात गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला.  हे गुलाबी बोंड आळीचे संक्रमण आणि कपाशी पिकावर होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सीआयसीआर फेरोमेन लुअर्स विकसित करण्यात आले आहेत.

हा लुअर्स कमीत-कमी सहा आठवड्यांपर्यंत चालतो. यावर्षी कापूस उत्पादक प्रमुख राज्यांमध्ये याच्या प्रत्येकी १ हजार ट्राअल्स घेण्यात येणार आहे. या लुव्हर्सची ट्रायल केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या प्रक्षेत्रावर अगोदर करण्यात आली. तेव्हा तिथे आढळले कीया लुव्हर्सची मॉनिटरिंग ट्रॅपिंग क्षमता अतिशय चांगली असल्याचं समोर आले आहे. याचे एकरी तीस ट्रॅप लावावे लागतात अशी माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here