गुजरात राज्यात ता. 23 डिसेंबरपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार 53 हजार हेक्टरवर रब्बी कांदा लागणी झाल्या आहेत. गुजरात कृषी खात्याकडील माहितीनुसार गेल्या वर्षी याच कालावधीत 33 हजार हेक्टरवर लागणी होत्या. म्हणजे 20 हजार हेक्टरने किंवा 60 टक्क्यांनी लागणी वाढल्या आहेत. महाराष्ट्रात डिसेंबरअखेपर्यंत किती लागणी वाढल्यात हे लवकरच कळेल. पंचवार्षिक सरासरीच्या तुलनेत 2021 मध्ये रब्बी कांदा लागणी देशभरात नवा बेंचमार्क सेट करतील. देशाच्या एकूण रब्बी क्षेत्रात महाराष्ट्राचा वाटा 50 टक्के आहे. फेब्रुवारीअखेपर्यंत कांदा लागणी सुरू राहतील. मार्चच्या मध्यास महाराष्ट्रात आणि देशभरात कांदा लागणींत किती वाढ झाली ते कळेल. अर्थात, चालू तिमाहीत पाऊसमान, हवामान किती अनुकूल – प्रतिकूल राहते, यावर उत्पादकतेचे गणित अवलंबून आहे. लागणी वाढल्या म्हणून उत्पादन वाढतेच, हा समज गेल्या वर्षाने चुकीचा ठरवला आहे. भूजल उपलब्धतेमुळे महाराष्ट्रासह अन्य कांदा उत्पादक राज्यांत लागणींचे क्षेत्र वाढत आहे. आणि गुजरातच्या आकडेवारीवरून त्याचे एक कन्फर्मेशन मिळाले आहे.
- दीपक चव्हाण, ता. 1 जानेवारी 2021. #कांदा2021