“ओडिसाच्या पूजा भारती यांचे बॅक टु विलेज – जैविक शेती करावी यासाठी अनेक शेतकऱ्यांना केले प्रवृत्त”

1,360 views

जेव्हा पण कोणी चांगल्या पगाराची सरकारी नोकरी सोडून काही वेगळे करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडतो, का असे झाले.
बॅक टू विलेजच्या को – फॉउंडर पूजा भारती यांनी सरकारी पगाराची नोकरी सोडली असून कृषी क्षेत्रात काहीतरी वेगळे करण्याची त्यांची इच्छा आहे.
३२ वर्षीय पूजा शेतकरी कुटुंबातील असून लहानपणापासून त्यांनी पिकांची वाढ होताना पहिले आहे. घरीच सर्व पिकत असल्याने कधीही काही विकत आणण्याची गरज त्यांना पडली नाही.
आईआईटी खडगपूर येथून केमिकल इंजिनीयरिंग पूर्ण करणाऱ्या पूजा मूळच्या बिहारमधील नालंदा या ठिकाणी राहणाऱ्या आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यावर चांगल्या पगाराची नोकरीं असून देखील त्यांच्या मनाला शांती नव्हती.


अशातच कंपनीमध्ये काम करणाऱ्या एक सहकाऱ्याने फार्म्स अँड फार्मर्स या स्टार्टअप बद्दल सांगितले व तेव्हापासून त्यांनी कृषी क्षेत्रात काम करण्याचे ठरवले.
२०१५ मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन ४ महिने जैविक शेतीसाठी प्रशिक्षण देखील पूजाने घेतले.
सलग १ वर्षे ग्राउंड लेवलला काम केल्यावर पूजा यांनी मनीष बरोबर एप्रिल २०१६ मध्ये ओडिसामध्ये बॅक टु विलेज लाँच केले.
पूजा यांनी ओडिसातील ५ गावे निवडली व तेथील शेतकऱ्यांनाबरोबर मिळून जैविक शेतीवर काम करण्यास सुरवात केली. परंतु हे करणे एवढे सोपे नव्हते कारण शेतकऱ्यांना रसायनिक खतांचा वापर करणे सोडून जैविक शेती करण्यास मनवने अवघड होते.


त्यासाठी पूजा यांनी गावातच एक असे सेंटर उभारले ज्यामध्ये शेतकऱ्यांना जैविक शेतीबद्दल प्रशिक्षण देता येणे शक्य झाले त्याचबरोबर खत कसे तयार करावे याबाबत देखील वर्कशॉपचे आयोजन करण्यात येत होते.
ओडिसातील ३ जिल्यात त्यांनी १० जैविक फार्म सेंटर उभे केले असून त्यांना उन्नत कृषी केंद्र असे नाव दिले. प्रत्येक सेंटरला ५०० शेतकरी जोडले गेलेले असून अशा प्रकारे ५००० शेतकरी रजिस्टर झाले आहेत. आज अशी परिस्थिती आहेत की जवळपास सर्व शेतकरी जैविक पद्धतीने शेती करत आहेत. सर्व शेतकऱ्यांनी एवढे समृद्ध व्हावे की त्यांना बाहेर कुठेही काहीही खरेदी करण्याची गरज पडणार नाही असे पूजा यांना वाटते.
सध्या पूजा यांनी गुजरातमधील काही कंपन्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बाबत टायप केले आहे. ३०० एकर जमिनीवर शेतकऱ्यांची शेती चालू केली असून ७ वेगवेगळ्या प्रकारच्या तांदुळाची देखील लागवड करण्यात आली आहे. आज पूजा यांच्या बॅक टू व्हिलेज या मोहिमेमुळे अनेक शेतकरी जैविक शेतीकडे वळू लागले आहेत. नफा व त्याचबरोबर आरोग्यासाठी हितकाराक अन्नधान्य पिकवताना या शेतकऱ्यांना नक्कीच आंनद होत असेल असा विश्वास पूजा यांना वाटतो.

Respect

ऍग्रीवाला #agriwala #FNV #farmfresh #residuefree #TheHealthyFood #AgriwalaFarmersClub #organic

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here