ऊस पिकाला रासायनिक खते देण्याच्या योग्यपद्धती:-

मित्रानो ऊसाला रासायनिक खते टाकत असताना बरेचशे शेतकरी फेकून खते देतात
फेकून खते दिल्यामुळे त्यातील बरेचसे खत वाया जाते.रासायनिक खतांचा खर्च वाढतो.परंतु परिणामकारक रीजल्ट मिळत नाहीत.

मी मात्र गेली 21 वर्षे झाली सर्व खते मातीआड करून देतो. मातीआड खते देणे म्हणजे आई जसे लहान बाळाला घास चारवते अगदी तसच, एकही डोस वरती टाकत नाही.मातीआड खते दिल्याने काय फायदा होतो त्याचे एक उदाहरण तुम्हाला देतो…

गेल्या वर्षी माझ्या एक चार एकर क्षेत्राला खते द्यायचे काम सुरू होते.पहिल्या दिवशी दोन एकर क्षेत्राला खते टाकून मातीआड केले . राहिलेल्या दोन एकर क्षेत्राला दुसऱ्या दिवशी खत टाकायचे होते.परंतु रात्री अचानक मोठा पाऊस सुरू झाला. इतका मोठा पाऊस पडला की शेतातील ताली फुटून संपूर्ण पाणी बाहेर गेले. पाणी शेता बाहेर उलटून गेल्यामुळे मना मध्ये एक शंका होती की टाकलेली संपूर्ण खते पाण्याबरोबर वाहून गेली असावीत. त्यामुळे त्या क्षेत्राला आणखी एकदा खते द्यावी लागेल की काय..

15 दिवसांनी वापसा आल्यानंतर राहिलेल्या दोन एकर क्षेत्राला खते देण्यासाठी शेतामध्ये गेलो असता ,15दिवस आधी ज्या क्षेत्राला खते टाकली होती तो ऊस खते न टाकलेल्या ऊसापेक्षा एक फुटाने त्याची उंची वाढलेली दिसून आली .

मातीआड खते दिल्यामुळे पाऊसाचे पाणी शेताबाहेर पडून सुद्धा खते वाहून गेली नाहीत.त्यावेळी मातीआड खते दिल्यानंतर काय फरक पडतो ते स्वतः डोळ्यानी अनुभव घेतला.त्यामुळे मित्रांनो ऊसाला खते देत असताना खते फेकून न देता मातीआड करून द्या.त्याचा ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.

  • शेतीनिष्ठ श्री सुरेश कबाडे.
    ✍️प्रबंधक, होय आम्ही शेतकरी समूह,
    रा.कारंदवाडी ता:-वाळवा जि:-सांगली
    मोबा:- 9403725999

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here