ऊसावरील खोड किडीचे एकात्मिक व्यवस्थापन

1,569 views

प्रादुर्भावाची लक्षणे:-

खोडकीडीचा प्रादुर्भाव उसाच्या सुरवातीच्या वाढीच्या काळात कांड्या तयार होण्याच्या आधी होतो. खोडकिडीची अळी उसाच्या खोडाला छोटेसे होल करून आतमध्ये प्रवेश करते आणि खोडामधील आतील भागावर उपजीविका करते. या किडीच्या प्रादुर्भावामुळे 1 ते 3 महिने वयाच्या उसात पोंगेमर म्हणजे शेंडा जळल्यासारखी लक्षणे दिसून येतात. असे शेंडे हाताने ओढल्यास सहजपणे हातात येतात आणि या शेंड्याचा कुजल्यासारखा वास येतो. किडीच्या प्रादुर्भावामुळे जेठा कोंब जाळून जातो. सुरवातीच्या काळात जर प्रादुर्भाव झाला तर पूर्ण गड्डा जळून गेल्यामुळे शेतात खूप तूटआळे (गॅपिंग) होते. या किडीची पूर्वसंकेत नुकसान पातळी 15% पोंगेमर असून या पातळीनंतर शेतात नियंत्रणाचे उपाय अवलंबावेत.

नियंत्रणाचे उपाय

१) सुरू उसाची लागण करताना डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये करावी त्यामुळं खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो.

२)हिरवळीचे खत म्हणून ज्या शेतात धेंचा गाढला असेल तर अश्या शेतात खोडकिडीचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणात होतो.

३) 45 ते 50 दिवसानंतर उसाला माती लावून घ्यावी व बाळबांधणी वेळेत करावी त्यामुळं खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते.

४) शेतात पोंगेमर झाली असेल तर ती काढून नष्ट करून टाकावेत

५)किडीच्या सर्वेक्षणासाठी शेतात 10 कामगंध सापळे/ हे. या प्रमाणात लावावेत.

६) रासायनिक कीड नियंत्रणामध्ये खालील कीटकनाशकांचा वापर करावा.
क्लोरपायरीफॉस 20% ई.सी 2.5 मिली किंवा फिप्रोनिल 5% एस.सी 3 मिली किंवा क्लोरांटानीलिप्रोल(कोराजन) 18.5 एस. सी 0.3 मिली किंवा थायामिथोक्साम (कॅपकॅडीस) 75 % एस. जी. 0.3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
दाणेदार किटनाशकांमध्ये क्लोरांटानीलिप्रोल (फरटेरा) 0.4% @ 7.5 किलो किंवा फिप्रोनिल 0.3% @ 10 किलो प्रति एकर प्रमाणात मातीत मिसळून द्यावे.

डॉ. अंकुश जालिंदर चोरमुले
Ph.D (कृषी किटकशास्त्र) आष्टा, सांगली
8275391731

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here