ऊसामधील तणनियंत्रण भाग 6

तणनाशक वापराची काही मार्गदर्शक तत्त्वे :
👉🏻१) जमिनीत ओलावा असेल तरच उगवणपूर्व तणनाशकांची फवारणी करावी. कोरड्या जमिनीवर फवारणीचा उपयोग नाही.
👉🏻२) ज्या जमिनीवर उगवणपूर्व तणनाशके फवारली असतील तेथे वर्दळ करू नये. कारण फवारणीनंतर मातीवर एक प्रकारचे पातळ आवरण तयार झालेले असते. ते जेथे भंग पावते तेथे तण उगवते.
👉🏻३) ज्या जमिनीत सेंद्रिय घटक भरपूर असतो किंवा जी जमीन भारी असते तेथे कलिल कणांच्या पृष्ठभागावर तणनाशके धरून ठेवली जातात. अशा ठिकाणी जमिनीवर फवारणीच्या तणनाशकाचे प्रमाण वाढवावे.
👉🏻 ४) तण हे कोवळ्या अवस्थेत असताना नियंत्रण चांगले होते.
👉🏻५) ग्रामोक्झोन सारखे स्पर्शजन्य तणनाशक त्या तणाची पाने भिजतील इतक्या प्रमाणात वापरावे लागते. पण २, ४-डी सारखे आंतरप्रवाही तणनाशक कमी प्रमाणात वापरावे लागते.
👉🏻६) हवेत जेव्हा आर्द्रता जास्त असते तेव्हा तणनाशकाचा चांगला परिणाम होतो. उन्हाळ्याच्या दिवसात सकाळ अथवा संध्याकाळी फवारणी करावी.
👉🏻७) जोराचा वारा चालू असताना फवारणी टाळावी.
👉🏻८) पावसाळ्याच्या दिवसात तणनाशकाबरोबर स्टिकर किंवा स्प्रेडर वापरावेत. जमिनीवर फवारणीसाठी स्टिकर आवश्यक नाही.
👉🏻९) ढगाळ वातावरणापेक्षा स्वच्छ सूर्यप्रकाशात तणनाशक फवारणीचा चांगला परिणाम होतो.
👉🏻१०) आपणास हवे असलेल्या प्रमाणासाठी प्रथम स्टॉक सोल्युशन करून घ्यावे. या स्टॉक सोल्युशनपैकी आवश्यक तेवढे द्रावण पंपात घेऊन पंप पाण्याने भरावा व फवारणी करावी. जमिनीवर फवारणीसाठी एकरी ४०० लिटर पाणी घेणे योग्य.

डॉ. बी. एम. जमदग्नी (सर), M.Sc. (Agri), Ph.D.
वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ निवृत्त शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here