
तणनाशके जमिनीवर फवारल्यानंतर काय घडते ?
तणनाशके जमिनीवर फवारल्यानंतर काही भौतिक, रासायनिक व जैविक घटना घडतात. त्याचा जमिनीमध्ये शिल्लक राहणार्या तणनाशकाच्या अवशेषांशी संबंध असतो. तणनाशक मातीच्या संपर्कात आल्यानंतर सहा प्रमुख घटक त्याच्या अवशेषांवर परिणाम करतात.
👉🏻१) सूक्ष्म जिवाणूंद्वारे अपघटन होते.
👉🏻२) रासायनिक क्रियेने तणनाशकाच्या अवशेषाचे अपघटन होते.
👉🏻 ३) मातीच्या कणामधील कलिलावर अवशेष चिकटून राहतो.
👉🏻४) जमिनीत निचरा होऊ शकतो.
👉🏻 ५) तणनाशकाचे अवशेष बाष्परुपाने नष्ट होऊ शकतात.
👉🏻६) सूर्यप्रकाशाने तणनाशकाच्या अवशेषात अपघटन होऊ शकते.
या सगळ्याचा परिणाम होऊन आपण वापरलेल्या तणनाशकाचा थोडाच भाग प्रत्यक्ष उपयोगात येतो.
जे तणनाशक पाण्यात जास्तीत जास्त प्रमाणात विरघळते किंवा बाष्पीभवन होते ते तण नियंत्रणासाठी चांगले वापरता येते. व प्रभावी ठरते. याउलट भारी जमिनीत मातीच्या कणावर दीर्घकाळ अवशेषाने काही तणनाशके टिकून राहतात. ऍट्राझिन, सिमॅझिन, डायुरॉन व मेट्रिब्युझीन ही साधारणपणे ४ ते ६ महिने अवशेषाने मातीवर टिकून राहतात.
तण वनस्पतीच्या पानाचा खोडाशी असलेला कोन, अंकुराचे एक्सपोजर, पानाचा आकार, पृष्ठभागाचा प्रकार यावर तणनाशकाचा प्रभाव अवलंबून असतो. उभी अरुंद पाने असलेल्या वनस्पतीवर तणनाशकाचा प्रभाव कमी राहतो. तणनाशके परिणामकारक व्हावीत म्हणून जोडीला स्प्रेडर किंवा पेनीट्रेटर फवारणे उपयोगी ठरते.
फवारणीनंतर पानाच्या पृष्ठभागातून किंवा पर्णरंध्रातून (स्टोमाटा) तणनाशकाचा वनस्पती शरीरात शिरकाव होतो. पोलर प्रकारचे (पाण्यात विरघळणारे) तणनाशक पर्णरंध्रातून शिरकाव करते. पण पाण्यात न विरघळणार्या २, ४-डी एस्टरचा उपयोग मेणचट पृष्ठभाग असलेल्या वनस्पतीमध्ये जास्ती चांगला होतो.
फवारणीनंतर तणनाशकाचा पानातून पेशीमध्ये प्रवेश होतो. तेथून फ्लोएम या अन्ननलिकेतून ते तणांच्या शरीरभर पसरते. तण वनस्पतीच्या शरीरक्रियेवर त्याचा परिणाम होऊन तण मरून जाते.
क्रमशः
डॉ. बी. एम. जमदग्नी (सर), M.Sc. (Agri), Ph.D.
वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ निवृत्त शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
Very well info. Sir thanks
खूपच छान माहिती आहे
खूप छान माहिती आहे
कपासी करीता तन नाशक काेनती वापरावी जसे गाेल पत्ते जास्त तन आहे.जसे आघाडा केना कुंजर ईत्यादी तरी माहीती द्यावी ही िवनंती.
संताेष चाैधरी
गाव.िनमखेड बाजार ता.अजंनगाव सुजीै िज.अमरावती
9511773076
तसेच संञाची लागवड केलेली आहे.
खुप छान माहिती दिली
कपासी करीता तन नाशक काेनती वापरावी जसे गाेल पत्ते जास्त तन आहे.जसे आघाडा केना कुंजर ईत्यादी तरी माहीती द्यावी ही िवनंती.
संताेष चाैधरी
गाव.िनमखेड बाजार ता.अजंनगाव सुजीै िज.अमरावती
9511773076
तसेच संञाची लागवड केलेली आहे.
खूप छान
खूप उपयोगी माहीत आहे