उसाचे क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याकरिता साखर कारखान्यांनी प्रोत्साहनात्मक उपक्रम राबविण्याच्या कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या सूचना

1,571 views

उसाचे क्षेत्र जास्तीत जास्त ठिबक सिंचनाखाली आणावे. साखर कारखान्यांनी त्यांच्या क्षेत्रातील ऊस क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याकरिता प्रोत्साहनात्मक उपक्रम हाती घ्यावे. उसाच्या प्रजातीची निर्मिती करताना साखरेचे प्रमाण अधिक त्याचबरोबर अल्कोहोल निर्मितीसाठी योग्य प्रजातीच्या संशोधनासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

राज्यातील ऊस संशोधन प्रकल्पासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.धवन, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.संजय सावंत, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) संचालक विकास देशमुख, पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे डॉ.रासकर, डॉ.शरद गडाख आदी यावेळी उपस्थित होते.
राज्यातील चारही कृषी विद्यापीठ आणि ‘व्हीएसआय’ यांनी राज्यातील ऊस उत्पादन व संशोधनाबाबत दर तीन महिन्यांनी बैठक घ्यावी. याबाबत पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने समन्वय करण्याचे आवाहन कृषिमंत्री श्री.भुसे यांनी केले.
राज्यात ऊस संशोधनासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत पाडेगाव ऊस संशोधन केंद्र आणि व्हीएसआय या संस्था अग्रणी आहेत. कोकणातदेखील उसाखालील क्षेत्र वाढण्यास संधी असून त्या संदर्भात बैठकीत आढावा घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली येथील हवामान ऊस उत्पादनासाठी अनुकूल असून त्या अनुषंगाने व्हीएसआयने तेथे ब्रिडींग सेंटर उभारले आहे. तेथे देशातील विविध वाणांची लागवड करण्यात आली असून संशोधनाचे कार्य सुरु आहे. या क्षेत्राचा वापर कृषी विद्यापीठांनी करावा. तसेच व्हीएसआयला चाचण्यांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here